Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, December 20, 2023

मौजे गुरववाडी ता.अक्कलकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्कार समारंभ संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मौजे गुरववाडी ता.अक्कलकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्कार समारंभ संपन्न.. 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मौजे गुरववाडी तालुका अक्कलकोट येथे दिनांक 19. 12.2023.रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेची विद्यार्थिनी कुमारी शिवानी संतोष बोरगाव यांनी २०० मिटर रनिंग स्पर्धेमध्ये अक्कलकोट तालुक्यात 57 विद्यार्थी मध्ये एक नंबर आल्याबद्दल त्यांचे सत्कार सरपंच सौ.लक्ष्मी माळपा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच जिल्हा कन्नड शाळेचे ग्राम शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी श्री गुरुनाथ सूर्यकांत देवरमनी, उपाध्यक्षपदी अंबाबाई चित्रसेन कोळी ग्रामपंचायत सदस्य गुरववाडी यांची निवड करण्यात आली व सखी सावित्री समिती गुरववाडी यांच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिका चंद्रकांत ओंकारी यांची निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकारांचे सत्कार विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच विकासरत्न श्री माळप्पा पुजारी, गावचे तंटामुक्त अध्यक्ष व माजी सरपंच रवी किराणा स्वामी, डॉ.काशिनाथ मोती ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमनी.मल्लिनाथ इंगळगी ग्रामसेवक के .जी.मकानदार श्री श्रीशैल सावळी शिवाजी रावजी.श्रीमंत मोसलगी संतोष बोरगाव सावित्री श्रीमंत पुजारी व इतर बहुसंख्य नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment