Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 11, 2023

चर्मकार समाजाचा वधु वर परिचय मेळावा व पुरस्कार सोहळा संपन्न ...

 सारा न्यूज नेटवर्क - 

चर्मकार समाजाचा वधु वर परिचय मेळावा व पुरस्कार सोहळा संपन्न झाला..


सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला तालुक्यातील महुद येथे संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मोफत वधु-वर पालक सुचक मेळावा व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार शहाजी बापू पाटील होते, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दीपक आबा साळुंखे पाटील विधानपरिषद आमदार हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती  म्हनुन मा दादासाहेब कांबळे निवसी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांची उपस्थिती होती. 


या कार्यक्रमास मा गोपीनाथ ठोंबरे उपजिल्हाधिकारी ठाणे, मा दत्तात्रय खडतरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सहकारी संस्था फाऊंडेशन, मा भालचंद्र कांबळे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ब.स.पा, मा भाऊसाहेब कांबळे संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचारविरुद्ध जन आक्रोश संघटना, मा सुभाष कांबळे सेवानिवृत्त उपसंचालक आरोग्य विभाग, मा आनंद बामणे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिक्षक समिती, मा संतोष कांबळे संचालक सांगोला तालुका प्राथमिक शिक्षण सोसायटी, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास बहुसंख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते. 

 या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कांबळे संस्थापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था महुद यांनी यशस्वी पणे केले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment