सारा न्यूज नेटवर्क -
अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी दिले पर्यावरणाचे प्रबोधनात्मक धडे..
सोलापूर (प्रतिनिधी):- अमेरिकेतील शाळेतील विद्यार्थी शौर्य मंडलिक यांनी सोलापूर महानगरपालिकेतील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयक आणि व स्वच्छता विषयी जनजागृती पर माहिती दिली. अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था तसेच स्वच्छता आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थी दशेपासून तिथे असलेले शिक्षण व कृतिशीलता त्यामुळे तेथील देश सुंदर तसेच नियमाने पालन करणारे विद्यार्थी आणि हरितमय वातावरण असणारे असे देश तेथील विद्यार्थ्यांपासून मिळालेले त्या पद्धतीचे शिक्षण आणि स्वयंशिस्त या भावना त्याने येथे शाळेमध्ये व्यक्त केले आणि येथीलही विद्यार्थ्यांनी असे स्वयंशिस्त व निसर्गाबद्दल प्रेम असावे अशी आशा व्यक्त केली.
महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक सुतार सर तसेच नारायणकर सर आणि शिक्षिका स्नेहल पाटील यांनी या विद्यार्थ्याचे सांगितलेल्या प्रबोधन चे कौतुक केले .
शौर्य मंडलिक हे अमेरिकेतील लँग्वेज पब्लिक स्कूल मध्ये सातवी या इयत्तेत शिकत आहेत इतक्या कमी वयामध्ये प्रबोधनाचा आणि पर्यावरण तसेच अनेक गोष्टी बदल त्याचे अभ्यासू नॉलेज अशा अभ्यासु वृत्तीच्या हा विद्यार्थी सोलापुरातील पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांचे ते भाचे आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment