Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 11, 2023

तळे हिप्परगा, उत्तर सोलापूर येथील पारधी समाजाच्या वतीने मा.नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांचा सत्कार...

 सारा न्यूज नेटवर्क - 

*तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर येथील पारधी समाजाच्या वतीने माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांचा सत्कार.*

सोलापूर (प्रतिनिधी) :- माजी. नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या कामाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांनी सौ राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचीत जाती अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल मौजे तळे हिपरगा येथील पारधी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आज खऱ्या अर्थाने पारधी समाजाला न्याय मिळाला असून शासकीय योजनेचा पाठपुरावा करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी यांना रोजगार मिळवून देण्याबाबत विनंती करण्यात आली.

त्याबाबत नवनियुक्त भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारी सदस्य सौ राजश्री चव्हाण यांनी सांगितले की. माझ्या कामाची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेली जबाबदारी निस्वार्थीपणे राबवून संपूर्ण पारधी समाजाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करीन तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीन व देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आदिवासी समाजासाठी केंद्राकडून राबविलेल्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहीन समाजातील तरुण- तरुणी, महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक यांना देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांनी जनतेसाठी केलेली विकास कामे समजावून सांगून संपूर्ण समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या व राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.



सदर सत्कार समारंभाच्या वेळी माजी सरपंच छाया काळे, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण (श्रीरामपूर), कौशल्या काळे, फत्तेसिंग काळे, विश्वनाथ काळे, बाळू काळे, सावित्रा काळे,अन्नपूर्णा काळे,रामेश्वरी चव्हाण,चंदा काळे, निलेश काळे, समाजसेविका विमल काळे, हेमंत काळे,अधीसह असंख्य पारधी समाजातील बांधव उपस्थित होते व पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment