सारा न्यूज नेटवर्क -
विजापूर रोड येथील सोरेगाव स्मशानभूमी परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
सोलापूर (प्रतिनिधी) :- जगातील सर्व देशा मध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. दिल्ली,मुंबई व पुणे या सारख्या शहरात प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत तसेच सोलापुरातही प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अति वाहनामुळे व वृक्षतोड यामुळे पर्यावरण समतोल ढासळत चाललेला आहे. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे सातत्याने वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हे क्लबच्या व पर्यावरण प्रेमी च्या माध्यमातून चालू आहे.
प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जवळच्या परिसरात कमीत कमी एक रोप तरी लावावे तरच प्रदूषण नियंत्रण होण्यास मदत होईल. आजच्या दिवसाचे महत्व जाणुन सोरेगाव विजापूर रोड येथील सोरेगाव स्मशानभूमी परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब जांभूळ सिताफळ सावर अशोका बेल, शीलगुड अशा विविध देशी औषधी वनस्पतींची वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थितीत जलसंधारण विभागाचे अधिकारी गजानन होळकर , सोलापूर शहर व हद्द वाढभाग विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेश देवकर, हबीब बालक आश्रम चे सुवर्णा बेल ताई, सारा नेटवर्क चे राम हुंडारे, इको नेचर क्लबचे समन्वयक गिरीश येलमेली, अँडअसिफ पटेल व्यंकटेश भरले तसेच, छत्रपती शिवाजी प्रशाला सोरेगाव येथील विद्यार्थी व हबीब अनाथ बालकाश्रम येथील येथील विद्यार्थी इको क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर उपस्थितीत होते. कडुलिंब जांभूळ सिताफळ सावर अशोका बेल, शीलगुड अशा विविध देशी औषधी वनस्पतींची वृक्षारोपण करण्यात आले.
झाडे लावा, झाडे जगवा.. अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment