सारा न्यूज नेटवर्क -
शासकीय पोत्यातून होतोय रेशन धान्याचा काळाबाजार दुकान क्र क -16 चा परवाना रद्द करा, अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे मागणी..
सोलापुर (प्रतिनिधि ):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत शहरी भागात 50 टक्के लोकसंख्येला मोफत अन्नपुरवठा केला जातो. परंतु सोलापूर शहरात बरेच रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांची तक्रार ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन कडे वारंवार येत होती.
यामध्ये दुकान क्रमांक क-16 मधून शासकीय पोत्यातून रेशन धान्याचा काळाबाजार होतोय अशी तक्रार फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात ऑल इंडिया रिपोटर्स असोसिएशन कडे आली. त्या तक्रारी च्या अनुषंगाने पत्रकार संघाचे सचिव अब्दुल पठाण हे परिमंडळ कार्यालय क विभाग मधील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक 16 यांच्या कृतीवर वरील तक्रारी विषयी लक्ष ठेवून होते.
रास्त भाव धान्य दुकान क्रमांक क-16 या दुकानाविषयी ऑल इंडिया रिपोटर्स असोसिएशन कडे खालील तक्रारी प्राप्त झाल्या नागरिकांना त्यांच्या हक्काची शिधा वेळेवर न देणे, धान्य कमी देणे, मनमानी पणाने दुकान उघडणे, वृद्धांना /महिलांना दादागिरी ची भाषा करुन धान्य न देता परत पाठवणे, पॉशमशीन बिघडण्याचा बहाणा करून धान्याचा स्टॉक इतर गोडाऊनमध्ये हलवणे,
धान्याचा काळाबाजार करणे असे प्रकार राजरोसपणे होत आहेत. सदरचा दुकान परवाना क्रमांक ३४१६ एस आर आठवले या व्यक्तीच्या नावे आहे परंतु सदरचे दुकान हे दत्ता चव्हाण नामे व्यक्ती अनाधिकृतपणे रेशन माफियाला हाताशी धरून रास्त धान्य मार्केटमध्ये काळाबाजार विक्रीसाठी पाठवत आहे असा गंभीर आरोप ऑल इंडिया रिपोर्ट्स असोसिएशन वतीने करण्यात आला तसेच काळ्या बाजारात धान्य जात असल्याचा ठोस पुरावा फोटो आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध असून नागरिकांच्या घशातील अन्न हिसकावून मार्केटमध्ये मोकाट फिरणाऱ्या इस्ता चव्हाण या व्यक्तीवर जीवनावश्यक वस्तू कलम कायदा अंतर्गत फौजदारी करून अन्नधान्य प्रशासनाने परवाना रद करावा.
तरी माननीय साहेबांना माझी विनंती आहे की सदरचे दुकान क्रमांक क 16 हे नेमके कोण चालवते ?..रिमहरू आदींचा उलगडा होणे गरजेचे आहे कारण दुकानाचा परवाना आठवलेच्या नावाने आणि दुकान चालवतोय चिनू कटकम आणि दत्ता चव्हाण दुकान दोघे मिळून चालवतात तर मग अधिकृत पणे की अनाधिकृतपणे याची सखोल चौकशी व्हावी. मा. साहेबांनी वरील गोष्टीचा गांभीर्याने विचार करून दुकान क्रमांक क-16 तील शासकीय पोत्यामधून धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करून रेशन घोटाळेबाज व्यक्ती दत्ता चव्हाण याच्यावर फौजदारी दाखल करून जनतेस न्याय द्यावा अशी विनंती.ऑल इंडिया रिपोटर्स असोसिएशनचे प्रदेशअध्यक्ष सलाउद्दीन शेख, शहर अध्यक्ष विजयकुमार उघडे, नासिर शेख, दिव्य न्यूज संंपादक मुन्ना भाई पठान यांनी सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी व परिमंडळ अधिकारी क विभाग यांना भेटून निवेदन दिले आहे.
*अन्न धान्य वितरण अधिकारी यांच्या कारवाईकडे आता लागून राहिले लक्ष*
सोलापूर शहरात अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय अंकित परिमंडळ कार्यालय अ विभाग ब विभाग क विभाग व ड विभाग असे चार कार्यालय असून यामध्ये परिमंडळ कार्यालय क विभागाचा परिसर मोठा असून रास्त भाव धान्य दुकानाची संख्या देखील मोठया प्रमाणात असल्यामुळे परिमंडळ कार्यालय क विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडले असून या कार्यालयाच्या बाबतीत अनेक तक्रारी असल्याचे बोलले जात आहे आता काळ्या बाजारात धान्य विक्री करत असल्याचा आरोप असलेल्या रास्त भाव धान्य दुकान क्रमांक क -16 वर अन्न धान्य वितरण अधिकारी सोलापूर यांच्या कारवाई कडे लक्ष लागून राहिले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment