सारा न्यूज नेटवर्क -
युनिक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील सर होते. संस्थेचे मान्यवर अध्यक्ष मा. श्री राजशेखर शिवदारे अण्णा यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी वार्षिक क्रिडा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन २८ नंबर मनपा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुतार सर यांच्या हस्ते आकाशात उंचच उंच फुगे उडवून करण्यात आले. वार्षिक क्रिडा सप्ताहात शाळेचे नर्सरी ते दहावीच्या विदयार्थानी विविध खेळात आपला सहभाग नोंदवला वैयक्तीक खेळात विदयार्यानी विशेष नैपुण्य दाखवून बक्षीसे प्राप्त केली. त्याचप्रमाणे फूटबॉल, क्रिकेट, कब्बडी, खो खो या सारखे सांघीक खेळात क्रिडा स्पर्धा शाळेच्या मैदानावर घेण्यात आल्या. यात यशस्वी झालेल्या विजेते संघ तसेच वैयक्तीक किडाप्रकारातील यशस्वी खेळाडू यांचा बक्षीस समारंभ व त्याप्रमाणे वर्षभर शाळेत झालेल्या विविध स्पर्धाची व स्पर्धापरिक्षांची बक्षीसे, शिष्यवृत्ती परिक्षा, एजब्रेन डेव्हलपमेंट परिक्षा, M.T.S ऑलिंपियाड परिक्षा हयात यशस्वी सर्व स्पर्धकांना पारितोषीक देउन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे शाळेचे प्राथमिक मधून इयत्ता चौथीतील आदर्श विदयार्थी व विदयाधींनी आणि त्याचे पालक यांचा सक्तार करण्यात आला आदर्श विदयार्थी कु.श्रेयस सुनिल बन्नी आदर्श विदयार्थीनी कु. सृष्टी कल्याणराव शेरीकर. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीतील ओमकार शिवराज नागोजी हयाला आदर्श विदयार्थी म्हणून गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीतील गुणवंत विदयार्याचा सत्कार करण्यात आला .
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment