सारा न्यूज नेटवर्क -
प्रभाग 26 मध्ये राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तीमय वातावरणात संपन्न.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सैफुल विजापूर रोड, येथे २३/१२/२०२३ सायंकाळी सात वाजता प्रभाग 26 मधील राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथून आलेला अक्षता कलशाचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती. व गुलाबाच्या पाकळ्यानी अक्षता कलश वर उधळण करीत होते.
जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम,अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
श्रीराम अक्षदा कलशची आरती करून भक्ती भावानी मंदिर परिसरात ठेवण्यात आली. प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग, तरुण वर्ग,यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशचे मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. व मंदिर परिसरात मोठ्या भक्ती भावाने भजन गीत सादर केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यावेळी प्रभाग 26 च्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले की. आज खऱ्या अर्थाने आपल्या नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी येथून अक्षता कलशाचे आगमन होणे म्हणजे हे आमचे भाग्य आहे. तसेच 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी बारा वाजता प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून जसे आपण दिवाळी सण साजरा करतो त्याच धर्तीवर 22 जानेवारी 2024 रोजी सर्वांनी संध्याकाळी लख दिव्यांनी उजळून निघेल असा सण साजरा करावा असे मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी मोतीबने सर, सूर्यवंशी सर, संजय जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी कटारे, पार्वती आमणे, शैला सूर्यवंशी, दिपाली कुलकर्णी, शिंदे आक्का, रश्मी कुलकर्णी, अश्विनी आमणे, पाटील ताई, वृंदा कुलकर्णी, नीलिमा कुलकर्णी, सौ आंबिगिरे, मंजुषा मोतीबने, सुवर्णा रुपनर, सुनंदा कल्याणकर, तमशेट्टी ताई, महानंदा कटारे, सोनाली पाटील, डॉक्टर कोरे मॅडम, पूजा मोतीबंने, तसेच बंडापा नगर मधील सौ तेजस्विनी कुंभार, सविता डिंगणे, मानवी कुंभार, अजय भोसले साहेब, मालपुरे सर, शरद कुंभार, अमोल कुंभार, राजकुमार धडे, सुलाखे सर आधीसह असंख्य महिला वर्ग,तरुण वर्ग,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच नगरसेविका सो.राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडापा नगर, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार, येथील नागरिकांनी भव्य सत्कार करण्यात आला व पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment