सारा न्यूज नेटवर्क -
आदर्श " सामाजिक संस्था " पुरस्काराने जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सन्मानित..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांना रि पा इ व अल्पसंख्यांक विभाग सोलापूर यांच्या वतीने अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील " सामाजिक संस्था " पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जीके मागासवर्गीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या त्या त्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, पुष्पगुछ आणि बोधचिन्ह ( ट्रॉफी) अस पुरस्काराचे स्वरूप होते.
राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन सोलापूर रंगभवन चॊकातील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी रि पा इं चे प्रदेशअध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या सामाजिक संस्था पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेहबूब तांबोळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून धम्म रक्षित कांबळे व प्रा डॉ अब्दुल रेहमान गदवाल होते.
यावेळी रि पा इ चे प्रदेशअध्यक्ष सुबोध वाघमोडे, माणिक आठवले, सुखदेव साबळे, श्रीमंत गायकवाड, धर्मा माने, संगराज बिराजदार, सलीम मुल्ला, इम्रान शेख, इब्राहिम शेख, नसरीन शेख, रफिक शेख,संदीप ससाणे, कविता ससाणे, पूनम मोरे, संगीता शिरसागर, कल्लाप्पा बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रचे सूत्र संचालन रावसाहेब परीक्षाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मा माने यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment