सारा न्यूज नेटवर्क -
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलिस मित्र असोसिएशनचा वृक्षारोपण उपक्रम संपन्न...
इचलकरंजी (प्रतिनिधी) :- बहुजन उद्धारासाठी आरक्षणाचे पहिले पाऊल उचलणारे तसेच संस्थानात सक्तीचे शिक्षण राबविणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील विनायक हायस्कूल शहापूर जवळ पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने 50 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे म्हणाल्या या वृक्षारोपण संवर्धन व जतन करायची जबाबदारी इचलकरंजी शहर पदाधिकारी घेत आहेत.तसेच पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने शासनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत यामाध्यमातून वृक्षारोपण हा एक उपक्रम सुद्धा राबविण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे म्हणाले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला याचे कारण म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा होत असलेला र्हास हेही एक महत्वपूर्ण कारण होय. यामुळे 2024 मध्ये देशात उष्माघाताचे अनेक बळी गेले आहेत, शैक्षणिक विद्यार्थी उष्माघाताचे शिकार झाले आहेत तर अनेकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.पुढच्या अनेक वर्षानंतर ऑक्सिजनची गरज भासणार आहे. कदाचित सर्वसामान्य माणसांना तो हॉस्पिटलमध्ये विकत घेऊन न परवडणारा आहे.भविष्यातील उष्माघाताचे परिणाम ओळखून सर्वानी झाडे लावून ती संवर्धन करून जगविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
या उपक्रमाचे आयोजन महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने व इचलकरंजी शहर अध्यक्ष आशा वाघिरे व सचिव संगीता रुगे यांच्या नियोजनातून करण्यात आले.उपक्रमासाठी राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पोलिस मित्र असोसिएशनचे राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे,टीम प्रमुख मिलिंद चव्हाण,उप राज्य टीम प्रमुख अनिकेत गुरव, कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष नंदा जगदाळे,कोल्हापूर शहर उपाध्यक्ष सविता भांडवलकर,इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष सरस्वती हजारे, महिला शहर संपर्कप्रमुख श्रद्धा खेडगे, स्वाती जाधव,तुळसा काटकर आदी पदाधिकारी व सदस्य टीम उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment