सारा न्यूज नेटवर्क -
*पत्रकार प्रसाद जगताप मारहाण प्रकारणी पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची दखल सीताराम बत्तूल वर गुन्हे दाखल*
सोलापूर (प्रतिनिधी ) :- येथील दैनिक अबतक चे संपादक व न्यूज 24 मराठी चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी प्रसाद जगताप हे दिनांक 28/3/2024 रोजी आपल्या कार्यालयात (1568 दाजी पेठ सोलापूर ) येथे दैनिक अबतक वृत्त पत्र चे कामकाज करत असताना त्याच भागातील राहणारे सीताराम बत्तूल या व्यक्तीने प्रसाद जगताप यांना तू आमच्या भावाला अर्ज का टायपिंग करून देतो माझ्या विरुद्ध तक्रार का लिहून देतो तुला सोडणार नाही तुला बघून घेतो म्हणून शिवीगाळ व धमकी दिलेली होती
दैनिक अबतक चे संपादक व न्यूज 24 मराठी चे जिल्हा प्रमुख प्रसाद जगताप यांना धमकी दिल्याची माहिती मिळताच पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक होऊन पत्रकार प्रसाद जगताप यांना धमकी व शिवीगाळ करणाऱ्या सीताराम बत्तूल या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण कदापी सहन केली जाणार नसल्याच स्पष्ट करून आक्रमक भूमिका घेतली होती त्याच बरोबर न्यूज 24 मराठी जिल्हा प्रमुख पत्रकार प्रसाद जगताप मारहाण प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासन ला दिला होता.
पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदन ची पोलीस प्रशासन घेतली गंभीर दखल सीताराम बत्तूल वर गुन्हे दाखल
न्यूज 24 मराठी चे जिल्हा प्रमुख प्रसाद जगताप मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती ने आक्रमक भूमिका घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे लावून धरण्यात आली होती त्यावेळी सोलापूर वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विष्णू (महाराज ) कारमपुरी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप कुणाल धोत्रे डी डी पांढरे संतोष जाधव विठल वठारे यलप्पा अगलदिवटे श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी रिजवान शेख सुमित भांडेकर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने न्यूज 24 मराठी जिल्हा प्रमुख प्रसाद जगताप यांना धमकी देणारा व मारहाण करणारा सीताराम बत्तूल यांच्यावर जेलरोड पोलीस ठाणे येथे क्रमांक 373/2024 भादविस कलम 504/506 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment