सारा न्यूज नेटवर्क -
शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ तर्फे परिमंडळ अधिकारी वाघ पुरवठा निरीक्षक देशमुख (ब विभाग) व परिमंडळ अधिकारी गवळी( क विभाग) सोलापूर यांना निलंबित करण्याकरिता थाळी नाद आंदोलन..
सोलापूर(प्रतिनिधी) :- शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ तर्फे परिमंडळ अधिकारी ब विभाग येथील परिमंडळ अधिकारी वाघ पुरवठा निरीक्षक देशमुख व परिमंडळ अधिकारी क विभाग गवळी यांनी पदाचा दुरुपयोग करून मर्जीतल्या दुकानदारांना बेकायदेशीर अंतोदय शिधापत्रिका दिलेले आहेत रास्त दुकानदाराचे व शिवभोजन चालकाचे नागरिकांनी तक्रार दिल्यास त्या तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही केली जात नाही उलट नागरिकांनाच दम दिलं जात आहे.कार्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी असताना ही वाघ व इतर कर्मचारी कित्येक घंटे मोबाईल वर बोलत असतात.
वाघ व गवळी यांनी अधिकार नसताना पदाचा दुरुपयोग करून कार्यालयात बेकायदेशीर खाजगी व्यक्ती (दलाल) नेमलेले आहेत वाघ व गवळी यांना खाजगी व्यक्ती (दलाल) नेमलेले बाबत विचारणा केल असता आमच्याकडे शासनाने एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी व्यक्ती नेमलेले आहेत तुम्ही हेड ऑफिसला विचारा तुम्हाला पत्र मिळेल असे उडवा उडवीचे उत्तर देतात वाघ,गवळी,देशमुख यांच्या विरोधात अनेक सुज्ञ नागरिकांनी शेकडो तक्रारी प्रशासनाकडे दिलेले आहेत त्या तक्रारीवर कोणतीच कायदेशीर कार्यवाही न करता उलट वाघ, गवळी, देशमुख यांना प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे, यांनी पाठीशी घालून संरक्षण देऊन वाघ, गवळी यांची झालेली बदली रद्द केली आहे प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांचे आशीर्वाद वाघ, गवळी यांना आहे व प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत.
वाघ, गवळी, देशमुख यांच्या विरोधात सन २०१८ पासून ते आजपर्यंत नागरिकांनी दिलेले सर्व तक्रारीवर उच्चस्तरीय समिती नेमून कायदेशीर कारवाई करून वाघ, गवळी, देशमुख यांना सेवेतून निलंबित करावे अन्यथा पुढील काळात भिक मागो आंदोलन करून भिकेत जमलेले पैसे प्रधान सचिव पुरवठा विभाग, पुरवठा उपायुक्त पुणे यांना पाठवण्यात येणार आहे.
असे माहिती. शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षणसंघ चे प्रदेशअध्यक्ष नितीन कांबळे यांनी दिले.
सदरील आंदोलन मा. निवासी उप जिल्हाधिकारी मॅडम यांनी कारवाई करते असे आश्वासने दिल्याने आंदोलन तात्पुरतं स्थगित केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment