सारा न्यूज नेटवर्क -
जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला येथे मोठ्या उत्साहात योग दिन साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगात योगाबद्दल उत्साह आहे. गेल्या दहा वर्षात योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या आहेत. योग आता मर्यादित व्याप्तीतून बाहेर येत आहे.
विजापूर रोड वरील जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला व जागृती प्राथमिक विद्यामंदिर नेहरूनगर सोलापूर या प्रशालेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पतंजली योग समिती चे योगशिक्षिका सौ शितल राजू डांबरे व सौ संगीता शिरीष उमर्जेकर यांनी आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना योग प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्याकडून व शिक्षकाकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थ्यांना योगा विषयीचे महत्व व माहिती सांगितली.
या योग शिबीर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे प्राचार्य श्री विजयरत्न चव्हाण हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री संतोष जाधव सर यांनी केले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षिका श्रीमती राठोड एन ए यांनी योग शिक्षिकांचा परिचय सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना करून दिला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री यशवंत जाधव, श्री म्हमाणे एम एल, सौ कांचन चव्हाण मॅडम, सौ पाटील मॅडम, प्राध्यापक श्रीधर सगेल व प्रशालेतील प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून योग प्रात्यक्षिकात प्रत्यक्ष सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुण्यांचा प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व आभार मानून करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment