Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 28, 2024

छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर दगडफेकीच्या निषेधार्थ रास्ता रोको, समस्त हिंदू संघटना उतरल्या रस्त्यावर..



सारा न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर दगडफेकीच्या निषेधार्थ रास्ता रोको,  

समस्त हिंदू संघटना उतरल्या रस्त्यावर..

 सोलापूर (प्रतिनिधी) :-पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.


यावेळी विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.



पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका जहाजिवृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक केला त्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दगडफेक करणारा हा पीएसआय पठाण यांचा मुलगा आहे. तो मुलगा छत्रपतींच्या स्मारकावर दगडफेक कसा करतो, त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे, त्याला लगेच मनोरुग्णाचे सर्टिफिकेट कुठून आलं.? त्याला लगेच जामीन कशी झाली.? हे सर्व संशयाचे वातावरण आहे. आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको केलेला आहे. विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा. या महापुरुषांमुळे हिंदू आपलं अस्तित्व आहे हिंदू राष्ट्र आहे. त्यांची विटंबना होत असेल तर हिंदू धर्म कधीही गप्प बसणार नाही. गड किल्ल्यांवर अतिक्रमण चालू आहे ते आम्ही काढू, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही हिंदू कधीही गप्प बसणार नाही अशांना आम्ही चोख उत्तर देऊ, आमची मागणी आहे पीएसआय पठाणला निलंबित करा तरच खऱ्या अर्थाने ही कारवाई होईल. त्या आरोपीस मोकाट सोडू नये अन्यथा आमच्या देखील मनोरुग्ण भरपूर आहेत. या सर्व विषयासाठी आम्ही रास्ता रोको केला असून आगामी काळात कडक कायदा झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुधाकर बहिरवडे यांनी दिला.



यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, ओम साई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड, श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजकुमार पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल, हिंदुराष्ट्र सेना रवी गोणे,  बजरंग दल संयोजक नागेश बंडी, अंबादास गोरंटला, सुरज भोसले, सतीश आनंदकर, पवन कोमटी, यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी युवक सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment