सारा न्यूज नेटवर्क -
*दिमाखदार सोहळ्यात झाले नवागतांचे स्वागत.....*
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा एस आर पी कॅम्प, सोलापूर
*गणवेश, बूट, पाट्या, वह्या, चॉकलेट, सुंदर फळा- फुलांची झाडे, जिलेबी, व्हेज पुलाव यांच्या वाटपाने प्रवेशोत्सव - 2024 झाला साजरा.*
सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,एस आर पी कॅम्प सोलापूर शाळेत आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. विक्रमी 51 मुलांच्या नवीन शाळेत दाखल झाल्याने शाळेचे वातावरण बदलून गेले. मोठ्या प्रमाणात *माता पालकांची उपस्थिती हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ प्रियांका माळी या होत्या, पंचायत समिती उत्तर सोलापूरचे सौ यादव मॅडम, श्री मनोज देवकर इको क्लबचे अध्यक्ष, श्री व सौ नागेश धननाईक, अंगणवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ अरेनावरु, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री रणखांबे, अंगणवाडी सौ बिराजदार व बहुसंख्य पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
*प्रभात फेरी*
ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थी व पालक वर्गांच्या प्रभात फेरीने एसआरपी कॅम्प परिसर झाडे लावा झाडे जगवा, मुलगा मुलगी समान, देऊ त्यांना शिक्षण छान, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा या घोषणानी दणाणून गेला. *_लेकरांचे शिक्षणाचे पहिले पाऊल शाळेत पडत होते त्याचे कौतुक पाहून आईचे डोळे भरून येत होते_*
माननीय समादेशक यांच्यावतीने श्री पोटे साहेब यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सर्व बालकांना शुभेच्छा दिल्या.
शाळा पूर्व तयारी मेळावा
*गुलाब पुष्पांचा वर्षाव*
सर्व नवागत मुलांचे गुलाब फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.
*शिक्षणाचा श्री गणेशा औक्षण करून*
इयत्ता पहिली मध्ये दाखल होऊन आयुष्याच्या शिक्षणाचा शुभारंभ करणाऱ्या बाल चिमुकल्यांचा शिक्षिका माता यांच्या हस्ते औक्षण करून स्वागत.
*सहा टेबलांची सुंदर व आकर्षक मांडणी*
पूर्वतयारीच्या नियोजनानुसार भाषा विकास गणन कौशल्य विकास सामाजिक विकास इत्यादी द्वारे सुंदर शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्ययनाची सुरुवात.
*सुंदर व आकर्षक सेल्फी पॉईंट*
अंगणवाडी ताई सौ.करकंटी व शिक्षकांच्या प्रयत्नातून सुंदर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. प्रत्येक विद्यार्थी तेथे आपली सेल्फी घेत होता. सुंदर फलक लेखन सो सारिका राठोड मॅडम यांच्या लेखणीतून साकारले.
*100% विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळानुरूप बदलले पाहिजे ही भूमिका शाळेने स्वीकारली. खाजगी शाळांच्या व माध्यमाच्या स्पर्धेत स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी दिमागदार गणवेश शाळेने सर्व विद्यार्थ्यांना पुरविला.
*बूट वाटप*
शासनाकडून निधी प्राप्त नसला तरी पहिल्या दिवशी बूट वाटप करून विद्यार्थ्यांना सुखद धक्का मिळाला.
*शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप*
शाळेत आलेल्या सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
*पुलाव भात व जिलेबी वाटप*
विद्यार्थ्यांना पुलाव भात व जिलेबी *श्री योगेश बारसकर* अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, संचालक यांनी मुलांना खाऊ जिलेबी वाटप करण्यासाठी दिले. त्यांचे मनःपूर्वक आभार.
*वाढदिवस साजरा*
चि. संकेत नागेश धननाईक यांचा 17 वा. वाढदिवस पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी धननाईक कुटुंबाने शाळेला मोगरा, गुलाब, जाई जुई, पारिजातक यासारख्या अत्यंत सुंदर फुलांच्या दहा वृक्षांची, व चॉकलेटचे भेट शाळेला दिली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियांका माळी यांनीही सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट भेट दिले.
*वृक्षारोपण*
चि. संकेत नागेश धननाईक यांचा 17 वा. वाढदिवस पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून साजराकरण्यात आला.
*एक मुल, एक झाड* यानुसार पहिली दाखल हॊणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते एक एक झाड लावण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक सौ सारिका राठोड, सौ कृपा राठोड, श्री बाळासाहेब खटाळ, श्री श्रीशैल समदुर्ले अंगणवाडी ताई सौ बिराजदार, सौ. करकंटी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री पुंडलिक कलखांबकर यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब खताळ यांनी मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment