सारा न्यूज नेटवर्क -
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे महादेव कोगनुरेंचं कार्य कौतुकास्पद : खासदार शिंदे.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सागर सिमेंट व एक के फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील विद्यार्थांना दोन लाख वह्या,अत्यंत गरजू विद्यार्थांना सायकली तसेच दहावी/बारावी परिक्षेत ८५% पेक्षा गुण घेतलेल्या विद्यार्थांना रोख रक्कम देवून खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूरतील जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व असून, धडाडीचे व्यक्तिमत्व आहेत, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं व्यक्तिमत्व आहे. धाडसी आणि साहसी नेता म्हणून मी त्याचा उल्लेख करते.महादेव कोगनुरे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपला नेतृत्व उभे केले आहे. खूप कमी वयात लोकप्रिय झाले आहेत.लोकसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून निवडणूक प्रचारात अथक परिश्रम घेतले.भावाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आता मी लेकीची जबाबदारी पुर्ण ताकदीने पार पाडणार असून मतदारांनी सर्वसामान्यांची लेक म्हणून मला निवडून दिले त्यांमुळे धर्माचे,जाती, पातीचे राजकारण न करता समस्त नागरिकांच्या विकासासाठी,न्यायासाठी, शेतकरी, कामगार,महिला, बेरोजगार अशा सर्व घटकांसाठी काम करणार असल्याचे खा प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले.तसेच लोकसभा क्षेत्रातील ६ ही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी च्या सर्व आमदारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असल्यास सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात धर्मराज काङादी म्हणाले की,विद्यार्थानं बद्दल असलेली आभाळ एवढी माया, गोरगरीब जनतेचा विश्वास, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याची जिद्द,असलेल्या महादेव कोगनुरे यांना राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा. तसेच जनसामान्यांच्या मनातील खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासाठी सर्व नेते, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्या पन्नास हजारांहून अधिक मताच्या लिडने निवडून आल्यात. येणाऱ्या काळात त्यांनी सर्वसामान्यांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी काम करावे. क्षेत्रातील जनतेच्या सुख,समृध्दीसाठी काम करून जनतेच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात असे मत व्यक्त केले.
यावेळी सिध्देश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काङादी,बसवारूढ मठाचे श्री.ब्र.श्री.शिवपुत्र महास्वामीजी,तद्देवाङीचे वेदमूर्ती महांतेश हिरेमठ,सागर सिमेंट चे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळाच पार पडला.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी राठोड यांनी मांडले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment