Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, June 23, 2024

सर्वसामान्य माणूस व शेतकरी हीच महादेव कोगनुरेंची ताकत...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सर्वसामान्य माणूस व शेतकरी हीच महादेव कोगनुरेंची ताकत... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सध्याच्या परिस्थितीत राजकारणाची दिशा भरकटली आहे. राजकारण आणि राजकीय नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. नको ते राजकारण आणि नको ते पक्ष असे म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. परंतु अशाही परिस्थितीत एक आश्वासक व प्रामाणिक चेहरा म्हणून महादेव कोगनुरे यांच्याकडे पाहिले जाते.दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे उद्याचे भविष्य  शेतकरी, कष्टकरी व तरुणांचा प्रभावी नेता म्हणून महादेव कोगनुरे यांची ओळख आहे. आपला हक्काचा माणूस विधानसभेत गेला पाहिजे यासाठी मतदारसंघातील शेतकरी तन-मन धनाने महादेव कोगनुरेंच्या पाठीशी उभे आहेत.


महादेव कोगनुरे यांचे विश्वासू अजित पाटील हे प्रसारमाध्यमांशी  बोलताना म्हणालेकी , 

 सत्तेचे किंवा लाभाचे अथवा कोणतेही पद नसताना नव्हे,दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांची मोठी फौज पाठीशी उभी आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रत्येक गावात हक्काचे कार्यकर्ते तर आहेतच सोबतच त्या प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिक, युवक, गावातील प्रतिष्ठित वयोवृद्ध, पुढारी अशा सर्वांशी महादेव कोगनुरे यांची अगदी जिव्हाळ्याची नाळ जुळलेली आहे.


 स्वच्छ प्रतिमा, अत्यंत प्रभावी वक्तृत्वशैली, कोणत्याही विषयाची अभ्यासू मांडणी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तरुण व आक्रमक तेवढाच आश्वासक वाटणारा चेहरा ही महादेव कोगनुरें ची आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल.हजारो लोक त्यांच्या एका हाकेवर सहभागी होतात.  सगळ्याच पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सर्वच समाजातून महादेव कोगनुरे यांना सकारात्मक पाठिंबा आहे. सातत्याने सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरण्याची हातोटी आणि प्रस्थापित नेत्यांना धडकी भरवणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील महादेव कोगनुरे यांची ओळख आहे.

  शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक व तरुणांच्या हिताला प्राधान्य देणारा काॅग्रेस पक्ष आहे, ही ठाम महादेव कोगनुरेंची भूमिका आहे. शिवाय दक्षिण सोलापूर मतदारसंघात महादेव कोगनुरेंसाठी तयार झालेली लाट पाहता त्यांची विधानसभा लढण्याची देखील तयारी आहे.


❗️अभी नही तो कभी नही❗️ अशी सुवर्णसंधी यावेळी निर्माण झालेली आहे. अशावेळी त्यांना संधी न मिळाल्यास महादेव कोगनुरेंचेच नव्हे, तर एका पिढीचे आणि शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान होऊ शकते.दक्षिण सोलापूर मतदारसंघाला एका आश्वासक व तरुण चेहऱ्याची गरज आहे आणि ती गरज महादेव कोगनुरे यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. आपल्या हक्काचा माणूस म्हणून महादेव कोगनुरेंचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे..

समोरच्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने बांधून ठेवण्याची हातोटी पाहता महादेव कोगनुरे यांना काॅग्रेस कडून उमेदवारीची संधी  मिळाल्यास ते निवडणूक लढवू शकतात.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक राम हुंडारे




No comments:

Post a Comment