Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 11, 2024

पंचायत समिती अक्कलकोटचे नूतन गट विकास अधिकारी श्री शंकर कवितके यांचा सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क

पंचायत समिती अक्कलकोटचे नूतन गट विकास अधिकारी श्री शंकर कवितके यांचा सत्कार.. 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-

अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून श्री शंकर कवितके यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

आज त्यांची अक्कलकोट पंचायत समिती कार्यालय येथे गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचा सोबत विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली. 

या निमित्ताने आज नूतन गट विकास अधिकारी श्री शंकर कवितके यांचा फेटा बांधून हार व शाल घालून तसेच पुष्पगुछ देऊन माळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 


या प्रसंगी गुरववाडीचे श्री अर्जुन बहादुरे, विजय मोती, शिवानंद मुंडेवाडी, श्रीमंत सावळी, राजकुमार औराद, गुरववाडीचे ग्रामसेवक के.जी.मकानदार, व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दोडमणी, श्री शिवानंद बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री संजय हरकेरी सरपंच तोळणुर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी व श्री मठ, राहुल शिंदे आदी बहुसंख्य लोक उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment