Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 6, 2024

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम; भैरुरतन दमाणी अंध शाळेत अंध विद्यार्थ्यां सोबत साजरा केला पर्यावरण दिन..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम;

भैरुरतन दमाणी अंध शाळेत अंध विद्यार्थ्यां सोबत साजरा केला पर्यावरण दिन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- आज दिनांक पाच जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भैरू रतन दमानी अंध शाळा या ठिकाणी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण दिनाची प्रतिज्ञा राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ प्रांजली मोहीकर यांच्याकडून सामूहिकरीत्या वाचण्यात आली.

"हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे" ही प्रार्थना देखील संस्थेच्या सदस्यांनी मिळून सादर केली.

शाळेतील अंध विद्यार्थ्यांकडून विविध बियांचे मातीमध्ये रोपण करण्यात आले.. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री संतोष भंडारी सर, ट्रस्टी माननीय श्री राजगोपाल झंवर सर, रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री स्वप्निल कोंडगुळे सर, तसेच श्री दीपक आर्वे सर (माजी सहाय्यक पोलीस आयुक्त) यांची विशेष उपस्थिती लाभली. 



प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रांजली मोहीकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, ज्यांनी ही सृष्टी पाहिली नाही असे अंध विद्यार्थी जर का पर्यावरणाला एवढा मोठा हातभार लावत असेल तर ज्यांना दृष्टी आहे त्यांनी पर्यावरणामध्ये सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे.. हा मोलाचा संदेश आजच्या या उपक्रमातून संस्थेद्वारे देण्यात आला... प्लॅस्टिक मुक्त पर्यावरण करत कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही मनोगतात त्या म्हणाल्या.

याप्रसंगी महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक, इको नेचर क्लबचे अध्यक्ष डॉ. मनोज देवकर सर यांचा " पर्यावरण दूत" म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. देवकर सरांनी मनोगतातून पर्यावरणातील उष्णता कमी करायचे असेल तर झाडे कशा पद्धतीने लावावी आणि त्याचे संवर्धन कसे करावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

भैरू रतन दमानी अंधशाळा संस्थेचे सचिव मा. श्री भंडारी सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, 

अधांच्या शाळेत हा सामाजिक उपक्रम म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे.."वृक्ष रुपी दृष्टी" यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल,,, उद्याच्या अनेक पिढ्यांना याचा उपयोग होईल...

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य श्री. प्रेमचंद मेने, ट्रस्टी सौ ज्योती मेने, श्री शैलेश मोहीकर,अनिश मोहीकर,वेदांत मोहीकर, डॉ. सुरेश खमीतकर, सौ शोभना सागर, श्रीमती अनुराधा निकम, श्री सुहास भोसले, श्री सिद्धार्थ भडकुंबे, श्री संगप्पा कांबळे, श्री राम हुंडारी, श्री अजित लकडे, श्री मंगेश दावणे, श्री राहूल वैरागकर, श्री राजेश्वर पाटील, डॉ. सिद्धेश्वर वाले आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुहास भोसले सर यांनी केले.

सर्वानी झाडे लावा, झाडे जगवा.. 

या घोषणा दिल्या. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment