Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 20, 2024

खासदार प्रणिती शिंदे यांना गावविकास कामासाठी 50 लाख निधीची मागणी..

 


सारा न्यूज नेटवर्क -

नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांना गावविकास कामासाठी 50 लाख निधीची मागणी..

सोलापूर (प्रतिनिधी) :- अक्कलकोट महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शितलताई म्हेत्रे व गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी आणि इतर ग्रामस्थ यांनी आज नवनिर्वाचित खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन सदिच्छा भेट घेण्यात आली व विविध विषयावर व गावविकास कामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.


 शितलताई म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणिती शिंदे यांना मौजे गुरववाडी ता.अक्कलकोटच्या गाव विकास कामासाठी 50 लाखाची निधीची मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे. 

 या निवेदनात प्रामुख्याने जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीत धनशेड बांधणे, सिमेंट काँक्रीट रस्ता, पैव्हर ब्लॉक बसविणे, समाजकल्याण विभाग मातंग समाज स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधणे, मरगम्मा देवी सभा मंडप बांधणे, दलित वस्ती पाणीपुरवठा योजना व अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, धनगर वस्ती क्रमांक 1 नाला बंदिस्त गटार, धनगर वस्ती क्रमांक 2 नाला बंदिस्त गटार, जलजीवन मिशन योजना ग्रामीण पाणी पुरवठा करिता अंदाजपत्रकपणे नवीन विहीर, नवीन पाईपलाईन व नवीन पाण्याची टाकी बांधणे इ. कामा बाबत सविस्तर चर्चा करुन निधी उपलब्ध करण्या बाबत विनंती करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी, अर्जुन बहादुरे, राजाराम विजापुरे, सुभाष बोरगाव, राजकुमार औराद, श्रीमंत सावळी, विजयकुमार मोती, शिवानंद रावजी, गुरुशांत सावळी,  ग्रामसेवक के जी मकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर बहुसंख्य लोक उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment