Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 15, 2024

ठाणे (दिवा) येथे गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ठाणे (दिवा) येथे गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ;

कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम.. 

ठाणे (प्रतिनिधी) :- व्यक्तीला अस्तित्वाची,क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय. हाच सिंध्दांत मनाशी बाळगुन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी  होतकरू विद्यार्थ्यांना 'वह्या' वाटण्याचा उपक्रम राबविला.सदर उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी यासाठी शिवसेना,दिवा शहरप्रमुख मा.रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सौ.दिपालीताई भगत आणि शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख उमेश अशोक भगत यांच्या शाखेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.


प्रसंगी उमेश भगत यांच्या शाखेचे शिलेदार सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख),संतोष पेंढारी (शाखाप्रमुख),अनिल मोरे (शाखाप्रमुख), नरेंद्र पाटील (उप शाखाप्रमुख)जेष्ठ शिवसैनिक एस.डि.पाटील आणि कार्यकर्ते सखाराम गोगावले,अवधूत पाटील, दिनकर बिटकर तसे इत्यादि कार्यकर्त्यांच्या सहकाराने उमेश अशोक भगत यांनी वया वाटपाचा उपक्रम राबवून गरीब,गरजु आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या जिवणात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापक सचिन रोकडे,सागर पवार, सुजल पवार,अक्षय अडवळकर,विशाल इत्यादि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment