सारा न्यूज नेटवर्क -
मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- 5 जून संपुर्ण जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मातोश्री गिरजाबाई ढोबळे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकूण ३० वृक्षांचे व रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात वड, कडुनिंब,आवळा, चिंच, पिंपळ व अशोक इत्यादी प्रकारचे झाडे व रोपे यांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक प्राचार्या डॉ. नदाफ मॅडम उपस्थित होत्या तसेच डॉ. पांढरे वासंती प्राध्यापक गुरव सर ,प्राध्यापक हेडे सर, प्राध्यापक माने मॅडम, प्राध्यापक जाधव मॅडम शेख सर व ग्रंथपाल साळुंखे मॅडम लिपिक धसाडे सर ,ट्रस्टी कसबे सर व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमास इको नेचर क्लबचे डॉ मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अजीत लकडे, रवी रणदिवे यांचीही उपस्थिती होती.
या महाविद्यालयास इको नेचर क्लबच्या माध्यमातून झाडे व रोपे देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थिनी, महाविद्यालयातील इतर स्टाफ व इको नेचर क्लबचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment