Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 4, 2024

प्रणिती शिंदे यांचा विजयाचा भर पावसात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रणिती शिंदे यांचा विजयाचा भर पावसात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष..

सोलापूर( प्रतिनिधी) :- नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यने विजयी झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागात भर पावसात विजयाचा जल्लोश साजरा करण्यात आला. 


पुरोगामी विचारसरणीच्या प्रणिती शिंदेंना संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते प्रणिती शिंदे यांचा विजय जाहीर होताच जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे फटाके फोडून व मिठाईवाटून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम सिताराम बाबर अरविंद शेळके सुलेमान पिरजाचे महेश भंडारी रमेश चव्हाण विजय बिल्ले गुरु नितीन देवकते राजेश चव्हाण दत्ता पवार आकाश चव्हाण श्रवण साळुंखे मल्लिकार्जुन शेवगार विश्वनाथ माने, रवी शिनगारे विजयकुमार जावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment