सारा न्यूज नेटवर्क -
"मिशन ग्रीन सोलापूर" माझी वसुंधरा अभियान या संकल्पनेनी आज शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज सोलापूर येथे वृक्षारोपण. 🌳🌳🌳🌎
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर मध्ये माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सोलापूर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकल कॉलेज मध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ अशोक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे जिल्हा विधी प्राधिकरण सेवा लोकाभिरक्षक अँड.देवयानी मॅडम,माझी वसुंधरा अभियान व सहाय्यक आयुक्त सोलापूर महानगर पालिका श्रीमती ज्योती भगत मॅडम,शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.अशोक उपाध्याय, डॉक्टर प्रशांत किल्लेदार, उपप्राचार्य अधीक्षक प्राध्यापक शिवलीला ख्याडे, इको नेचर क्लबचे सोलापूरचे संस्थापक व पर्यावरण दूत मनोज देवकर, सोनू सूद चॅरिटी क्लबचे सोलापूर संस्थापक व चित्रकार विपुल मिरजकर पर्यावरण गतिविधिचे मनोज पवार, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कॉलेजच्या अधीक्षक प्राध्यापक शिवलीला ख्याडे मॅडम ,पर्यावरण अधिकारीस्वप्नील सोनलकर ,उपप्राचार्य प्राध्यापक डॉ प्रशांत किल्लेदार सर, तिर्थकर सर, प्रा. अभयसिंग साठे प्रा. गायत्री हायनाळकर, व राष्ट्रीय सेवा योजना चे पूर्ण टीम भागवान सर व कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी सहित उपस्थित होते.या मिशन ग्रीन भारत करण्यासाठी मध्ये सर्व पर्यावरण प्रेमींची व आजी-माजी विद्यार्थी उडता सर, मनोज पवार ,सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी ,सोनू सुद फाउंडेशनचे विपुल मिरजकर ,पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर डॉ मनोज देवकर पर्यावरण दूत महाराष्ट्र शासन यांनी झाडांची व तसेच जेसीबीच्या साह्याने खड्डे मारणे आदी व्यवस्था केली.
प्राथमिक टप्प्यात आज सुरुवातीस 200 झाडांचा वृक्षारोपण सर्वांच्या मदतीने करण्यात आला.
या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये ऑगस्ट पर्यंत हजारो झाडांची लागवड करणार आहोत.आणि ही लागवड 3 टप्यामध्ये होणार आहे. बटरफ्लाय गार्डन सुद्धा होणार आहे. कॅक्टस गार्डन तसेच कंपाऊंडच्या साईडला हजार बांबू ट्री ही लावण्यात येणार आहे माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख व सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती भगत मनपा सोलापूर व पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर सर यांनी कॉलेजच्या समोरील मनपाच्या मोकळ्या जागेमध्ये ब्युटीफिकेशन गार्डन करण्याची सुरुवात केली आहे. 🌳
पुढील टप्प्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून पर्यावरण संदर्भात सातत्याने उपक्रम करत राहणार आहेत असे व मुलांना निसर्गाचे आव्हान निर्माण करून त्यांच्या हातून निसर्ग संवर्धनाचे कार्य करत निसर्गातील पुढचे पिढी तयार करण्याचे आव्हान डॉ मनोज देवकर यांनी केले आहे
सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग या निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यामध्ये सक्रिय राहणार आहोत व भारतातील सर्वोत्तम कॉलेज तंत्रनिकेतन हे राहील याची शपथ घेतली आहे असे डॉ उपाध्ये अशोक शासकीय तंत्रनिकेतन चे प्रिन्सिपल यांनी शब्द दिला आहे तसेच पर्यावरण गतिविधिचे मदन पवार याने नेहमी सहकार्याची भावना दाखवली आहे तसेच सोनू सूद फाउंडेशनचे विपुल मिरजकर यांनी आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करण्याची भावना बोलून दाखवली आहे शुभम सब्बन, हरिप्रसाद अडकी ,धनराज नदिमेटला तन्मय राम हुंडारे बीव्हीजी ग्रुप चे अजय कसबे तसेच सर्व सिक्युरिटी स्टाफ अनेक वृक्ष मित्रांनी वृक्षांच्या श्रमदानात सहभाग नोंदविला आहे कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ उपाध्य अशोक व उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत किल्लेदार सर यांनी सर्वांना मानसन्मान देऊन त्यांचा स्वागतही केले व वृक्षारोपण उपक्रमाचे प्रास्ताविकता व सर्वांचे परिचय संवाद कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर शिवलीला खेडे यांनी केले.
वृक्षारोपणात वड, पिंपळ, अशोका, आवळा, कडूनिंब, कदंब, बदाम अशा विविध देशी वृक्षांची वृक्ष लागवड करण्यात आली
जिल्हा विधी प्राधिकरण सेवेचे एडवोकेट देवयानी कणगी व डॉ मनोज देवकर कॉलेजच्या अधीक्षक प्राध्यापक शिवलीला खेडे यांनी हा वृक्ष लागवडीचा योग जुळून आणला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment