सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे विजयी ;
सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार..
वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर लोकसभा मतदारसंघा मतमोजणीच्या सर्व २७ फेऱ्या मंगळवारी ०४ जून रोजी सायंकाळ पर्यंत पूर्ण झाल्या. सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिला महिला खासदार होण्याचा मान प्रणिती शिंदेना मिळाला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ०७ मे रोजी १२ लाख ४ हजार ६११ मतदान झाले होते. प्रणिती शिंदेनी पोस्टल मतदाना साहित एकूण ७४ हजार ८१४ मतांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. सोलापूरच्या इतिहास पहिल्यांदाच सोलापूरला महिला खासदार लाभल्या आहेत. तीन वेळा सोलापूर शहर मध्यच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या खासदार झाल्या आहेत.
एकूण सत्तावीस फेऱ्या झाल्या -
सोलापूर लोकसभा मतदानाची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी झाल्या नंतर,ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी सुरू झाली. सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची विभागणी करत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्तावीस फेऱ्यात मतमोजणी केली. मतमोजणीच्या सुरुवातीला सुरुवातीला भाजपचे राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांच्यात खूप कमी अंतराचा आकडे होते. सत्तावीस फेऱ्याची संपूर्ण मतमोजणी झाल्या नंतर प्रणिती शिंदे ७४ हजार ८१४ मतांनी विजयी झाल्या आहेत.
वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला -
२०१४ साली केंद्रीय मंत्री पदावर असताना,सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला होता. अॅड.शरद बनसोडे यांनी तब्बल दोन लाख मताधिक्य घेत सुशीलकुमार शिंदेचा पराभव केला होता. २०१९ साली पुन्हा एकदा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंचा पराभव मठातील महाराज डॉ.जय सिद्धेश्वर महाराजांनी केले होते. वडिलांचा दोन वेळा झालेला पराभव आणि मागील दोन खासदारांनी केलेल्या कामाचा दाखल देत प्रणिती शिंदेनी राम सातपुतेना पराभवाची धूळ चारली आहे. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली सोलापूरचा कितपत विकास होतो याकडे सोलापूर करांचे लक्ष लागले
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment