Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 6, 2024

एस आर पी कॅम्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण करुन पर्यावरण दिन साजरा... वृक्षांचे सेंद्रिय खतांचा वापर करून आधुनिक सिंचन पद्धतीने संगोपन करणार -

 


सारा न्यूज नेटवर्क - 

एस आर पी कॅम्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण करुन पर्यावरण दिन साजरा...

सोलापूर (प्रतिनिधी) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प सोलापूर या ठिकाणी गुरुजनांच्या हस्ते 21 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात वड, कडुनिंब, चिंच, पिंपळ, आंबा व अशोक याचे वृक्षारोपण करण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री नितीन भोपळे (पाटील) माजी परिवहन समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिका हे होते. त्यांनी बोलताना सांगितले की, शाळेच्या भौतिक सुविधेत पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून रेन  हार्वेस्टिंग करून पाण्याचा निचरा करण्याचे काम पुढील काळात करून देण्याचे मान्य केले. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प शाळेतील वृक्षांचे सेंद्रिय खतांचा वापर करून आधुनिक सिंचन पद्धतीने संगोपन करणार. 

कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती श्री सिद्राम कटगेरी सर माजी चेअरमन मंद्रूप शिक्षक सहकारी पतसंस्था दक्षिण सोलापूर, श्री लिंबराज जाधव शिक्षक नेते शिक्षक संघ सोलापूर, श्री ब्रह्मदेव ज्ञानदेव राऊत जिल्हा परिषद शिक्षक, श्री प्रदीप कुमार मंदोले सेवानिवृत्त मुख्याध्यापक , श्री महाभोले  क्रीडा शिक्षक बोरोटी आश्रम शाळा, श्रीमती उमा देगिनाल इको नेचर क्लब सदस्य, श्री अभिजीत सुर्डीकर शिक्षक नेते, 


श्री मनोज देवकर इको क्लब अध्यक्ष, राम हुंडारे (शहराध्यक्ष) पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागणसूरचे उपशिक्षक तथा आजच्या कार्यक्रमातील वाढदिवस सत्कारमूर्ती श्री सिद्धाराम  तळवार, श्री मुश्रीफ जलाल शेख, श्री यादव सर, पोलीस कर्मचारी श्री व सौ करडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री पुंडलिक कलखांबकर यांनी प्रास्ताविक मांडले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

आलेल्या गुरुजनांच्या हस्ते शाळेमध्ये 21 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. हे सर्व वृक्ष  1 जून 2024 रोजी जन्मोत्सव गुरुजनांचा या कार्यक्रमांमध्ये वाढदिवस साजरा करताना गुरुजनाने शाळेला 75 वृक्ष देणगी स्वरूपात दिले होते. त्यातील 30 वृक्ष आतापर्यंत लावण्यात आले आहेत. भविष्यात पावसाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने झाडे लावण्यात येतील व त्याचे ठिबक सिंचन तुषार सिंचन इत्यादी आधुनिक पद्धतीने सिंचनाच्या पद्धती वापरून गांडूळ खत निर्मितीच्या माध्यमातून सेंद्रिय खताचा या वृक्षांना पुरवठा करण्याचे नियोजन शाळेकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतील प्रत्येक शिक्षक शालेय परिसर निसर्गरम्य बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याचीच ही फलश्रुती आहे. आज उपस्थित सर्व गुरुजनांनी शाळेला साऊंड सिस्टम भेट स्वरूपात देऊन शाळेच्या उपक्रमाचा गौरव केला. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री बाळासाहेब खटाळ, श्री श्रीशैल समदूर्ले, सौ प्रेमलता राठोड,  सौ कृपा राठोड, अंगणवाडी ताई सौ बिराजदार श्वेता इको नेचर क्लबचे सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन मुख्याध्यापक श्री पुंडलिक कलखांबकर यांनी केले. तर आभार श्री बाळासाहेब खटाळ यांनी मानले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment