सारा न्यूज नेटवर्क -
राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सोलापूरचे पत्रकार राम हुंडारे सन्मानित..
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल..
सांगली (वाळवा ) :- येथे संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा "समाजभूषण पुरस्कार" सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सामाजिक कार्यकर्ते सारा न्यूज नेटवर्कचे संपादक व पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष श्री राम हुंडारे यांना ग्रामपंचायत कार्यालय ता.वाळवा सांगली येथील समारंभात मोठ्या उत्साहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तात्रय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राम हुंडारे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत, विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, गरीब व गरजू लोकांना शासकीय योजना व शासकीय मदत मिळवून देणे, शालेय मुलांना वह्या व पेन वाटप करणे, बॅक कर्ज प्रकरणे बद्दल माहिती व मार्गदर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगार लोन साठी मार्गदर्शन व सहकार्य करणे, निराधार व बांधकाम कामगार कल्याण योजने संदर्भात जनजागृती करणे व कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा विविध विषयांवर सामाजिक कार्य केलेले आहे, त्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी, वाळवा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सांगली जिल्हा टिम यांचे हातभार लागले आहे. विशेष करून संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय आत्माराम कदम , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री देवप्पा शिंदे, महासचिव ज्ञानदेव कदम, संस्थापक सदस्य कैलास लोखंडे, प्रदेश युवक अध्यक्ष निशात भाऊ बुरूटे, किरण भाऊ बागडे, दत्ताभाऊ शिंदे, पच्छिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजयभाऊ शिंदे, अमोल कांबळे, जिल्हाअध्यक्ष अरुण गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष सांगली सौ.संगीता शिंदे यांनी परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment