Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, June 16, 2024

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिता कलशेट्टी धमकी प्रकारणी लिंबीचिंचोळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह इतरांनवर गुन्हे दाखल..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिता कलशेट्टी धमकी प्रकारणी लिंबीचिंचोळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह इतरांनवर गुन्हे दाखल.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :-  येथील सौ.अनिता शिवराज कलशेट्टी राहणार लिंबू चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर या "माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे" कार्यकर्त्या असून अनिता कलशेट्टी यांनी माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायत लिंबीचिंचोळी यांना पत्र पाठवून दिले होते. यातील आरोपी हे लिंबीचिंचोळी गावचे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचारी असून अनिता कलशेट्टी यांना तू ग्रामपंचायत कामकाजाबाबत का माहिती मागते व वारंवार पत्र का पाठवते असे म्हणून दिनांक 16/06/2024 रोजी अनिता कलशेट्टी ह्या आपल्या घरासमोर काम करत असताना त्याच भागातील राहणारे 

1) गीतांजली श्रीशैल माळी 

2) श्रीशैल माळी 

3) संतोष हक्के 

4) व इतर या सर्व व्यक्तीने  अनिता शिवराज कलशेट्टी यांना 

शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे. 

गीतांजली श्रीशैल माळी, श्रीशैल माळी, संतोष हक्के, व इतर यांच्यावर वळसंग पोलीस ठाणे येथे क्रमांक 0421/2024 भारतीय दंड संहिता1860 कलम 504/506,34 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

या बाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment