सारा न्यूज नेटवर्क-
राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
होनमुर्गी ता. दक्षिण सोलापूर : - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त होनमुर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांना आवश्यक साहित्य मिळाले. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन मेंडगुले, सोसायटीचे चेअरमन नबीलाल निंबाळे,जिल्हा उपसचिव सतीश शिंदे,माजी सरपंच अमोगसिद्ध वाघमारे, माजी सरपंच महेश पाटील, महेश नरसगोंडे, बसवराज हसापुरे, तालुकाध्यक्ष विशाल माने, जिल्हा संघटक बाबासाहेब माने,सरपंच बाळासाहेब तेली, मुख्याध्यापक अंबादास खडतरे, रामसिंग पवार, राष्ट्रीय बंजारा महासंघ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.




No comments:
Post a Comment