सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप पोलीसांची मोठी कारवाई..!
टाकळी येथे जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांविरुद्ध गुन्हा; 4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त
मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) -
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे तीन पाणी जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर मंद्रूप पोलिसांनी छापा टाकून 13 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण 4 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. 20/09/2026 रोजी सायंकाळी 19.30 वाजण्याच्या सुमारास टाकळी, ता. दक्षिण सोलापूर येथे काही इसम बेकायदेशीरपणे पैशांवर तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 396/2026 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. 21/09/2026 रोजी पहाटे 02.54 वाजता दाखल करण्यात आला असून फिर्यादी पोशि/664 गणेश जगन्नाथ पाटील (वय 36, नेमणूक मंद्रूप पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींची नावे :
1) रोहन रमेश चौगुले (रा. वरून)
2) सिद्धू तोडी कट्टी (रा. टाकळी)
3) राजकुमार लक्ष्मण सगाई (रा. टाकळी)
4) महेश भीमाशंकर तांडोरे (रा. बोळकवठा)
5) गुंडुराव बंडू पोद्दार (रा. हत्तरसंग)
6) सुभाष सिद्धाराम कुंभार (रा. टाकळी)
7) उमेश इरगोंडा बिराजदार (रा. टाकळी)
8) बसवराज जन्म (रा. टाकळी)
9) लक्ष्मण सिद्राम वंजारी (रा. टाकळी)
10) राजशेखर गायकवाड (रा. हत्तरसंग)
11) रवी बगले (रा. टाकळी)
12) शिवानंद लक्ष्मण घोडके (रा. टाकळी)
13) सचिन मेढेदार (रा. टाकळी) - सर्व तालुका दक्षिण सोलापूर
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
• 70,500/- रु. रोख रक्कम • 1,40,300/- रु. किमतीचे 6 अँड्रॉइड व बटन मोबाईल (Vivo, Samsung, Itel) • 2,45,000/- रु. किमतीच्या 4 हिरो कंपनीच्या मोटरसायकल (MH 13 CX 1166, MH13 DD 4308, MH13 DX 2839 व एक विना नंबर प्लेट स्प्लेंडर)
एकूण - 4,53,000/- रुपये
या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आलेली नसून त्यांना BNSS कलम 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
या गुन्ह्याची फिर्याद G. PSI पाटील यांनी दाखल केली असून पुढील तपास PSI डांगे हे करीत आहेत. सदर कारवाई परि. पोलीस उप अधीक्षक श्री. गणेश शिंदे, मंद्रूप पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments:
Post a Comment