सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती काळी फीत काळी टोपी परिधान करत रविवारी उतरणार रस्त्यावर - प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
सोलापूर (प्रतिनिधी ):- पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटार सायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच मंत्री आमदार खासदार यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वर येणे -जाणे परवडत नाही त्याच बरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोल चा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्ताकंन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे -जाणे जिकरीचे झाले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना वारंवार यावे लागते अनेकदा ऊन वारा व पाऊसामुळे पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळवा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 6/3/2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते या बाबत राज्य सरकार ने अद्याप निर्णय केला नाही त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक 5/3/2026 रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त यांना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती देखील करण्यात आली होती या बाबत राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी सोलापूर येथे लाक्षणिक आंदोलन देखील करण्यात आलं होतं परंतु ग्रामीण भागातील पत्रकारांना अद्याप एसटी बसमधून मोफत प्रवास मिळणे बाबत राज्य सरकार ने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही म्हणून राज्य सरकार चे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी *रविवार दिनांक 21/6/2026 रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर (आंदोलन गेट ) या ठिकाणी काळी फीत व काळी टोपी परिधान करून सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली असून*
या आंदोलनात पत्रकार बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केलं आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे
No comments:
Post a Comment