सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..
सोलापूर, दि. २६ जून २०२६ : - जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने मार्गदर्शक नागेश पासकंटी व सहकारी तानाजी शिवशरण यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचा शाल, टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती व समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अधिकाधिक यशासाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन करजोळे, इनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अशोक ढोणे, विजयकुमार उघडे, अक्षय बबलाद, सिद्धार्थ भंडकुबे, आंबा तळभंडारे, श्रीशैल चिंचोळकर, सलाउदीन शेख, महेश जाधव, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, आनंद मोरे, यशवंत फडतरे, सुरज रजपूत, ऋषिकेश ढेरे, नरेंद्र कांबळे, राजं लांडगे, मुकुंद गागंजी यांच्यासह पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागेश पासकंटी व तानाजी शिवशरण यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
💐 हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐


No comments:
Post a Comment