सारा न्यूज नेटवर्क -
शिवसेना शहर व दक्षिण सोलापूर भागातील शिवसैनिकांसाठी लवकरच हक्काचे जनसंपर्क कार्यालय उपलब्ध होणार आहे... - प्रकाशभाऊ राठोड...
अर्जुन टॉवर, विजापूर रोड येथील शिवसेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला....
सोलापूर :- शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. खासदार श्री. धैर्यशील माने साहेब - सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख, तसेच सोलापूरच्या रणरागिणी, बुलंद तोफ खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक व सर्वसामान्य जनतेसाठी स्वतंत्र शिवसेना संपर्क कार्यालय उपलब्ध होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक तसेच गोरगरीब नागरिकांना न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना संघटना बांधणीसाठी श्री. प्रकाशभाऊ राठोड यांच्या पुढाकाराने या सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा लवकरच करण्यात येणार आहे.
शुक्रवार, 12 जून 2026 रोजी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील आणि माजी सभापती श्री. आनंद तानवडे, श्री. नागेश पासकंठी, श्री. राजाभाऊ आलूरे, तसेच शिवसैनिक यांच्या शुभहस्ते नूतनीकरणासाठी नारळ फोडण्यात आला.
यावेळी श्री. लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, "येत्या काळात शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या जनसंपर्क कार्यालयामुळे तातडीची मदत, शासकीय योजनांची माहिती आणि समस्यांचे निवारण एकाच छताखाली मिळणार आहे. तसेच श्री. प्रकाशभाऊ राठोड यांचा प्रशासकीय दांडगा अनुभव असल्यामुळे पक्षसंघटन वाढीसाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मोठी मदत होईल."
श्री. आनंद तानवडे यांनी सांगितले की, "शिवसेनेच्या प्रत्येक भागात अशा प्रकारची जनसंपर्क कार्यालये उभारणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पक्ष आणि जनता यांच्यातील संवाद अधिक बळकट होईल."
सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख श्री. धैर्यशील माने तसेच खासदार सौ. ज्योतीताई वाघमारे यांचा इतर ठिकाणी दौरा निश्चित असल्यामुळे त्यांनी श्री. प्रकाश राठोड यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय नूतनीकरणास पुढील शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी श्री. अंकुश राठोड, उपशहर प्रमुख, श्री. राज चव्हाण, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख, श्री. संतोष जाधव, श्री. नवनाथ पवार, श्री. विनोद राठोड, श्री. सागर राठोड, श्री. प्रदीप जाधव, श्री. मल्लू रोकडे, श्री. नेहरू राठोड, श्री. राहुल राठोड, श्री. दीपक पवार, श्री. प्रदीप राठोड, श्री. विनोद जाधव, श्री. राजू पवार, तसेच नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे



No comments:
Post a Comment