Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, June 14, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्यात समीर शेख यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित’ 


 प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर (महावीर रणखांबे) 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ रविवारी (दि. १४) जुळे सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे  संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उत्साहात संपन्न झाला.

 राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या भव्य पुरस्कार सोहळ्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावचे सुपुत्र तथा दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी पत्रकार समीर कासीम शेख यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.


राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण, युवक, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण तसेच ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र रत्न, महाराष्ट्र समाजरत्न, समाजभूषण, आदर्श व्यक्तिमत्त्व, आदर्श ग्राम, जीवनगौरव आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ए.डी. फाउंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून गोरगरीब, अनाथ, अपंग, वृद्ध तसेच गरजू घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय जत (जि. सांगली) येथे असून संस्थेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले आहे.

संस्थापक अशोक श्रीपती गोरड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, उद्योजक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार समीर शेख यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल अंत्रोळी परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे




No comments:

Post a Comment