Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, June 1, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

1 जून शासकीय वाढदिवस ;

जिल्हा परिषद बागेत वाढदिवस सत्कार सोहळा उत्साहात साजरा..


सोलापूर, दि. १ जून २०२६ :– जिल्हा परिषद येथील बागेत आज वाढदिवस सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पत्रकार कृती समिती व आपाश्री मित्र परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा टोपी, शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

यामध्ये साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ढोणे, दैनिक दणका टाईम्सचे संपादक विश्वनाथ व्हनकुरे, साप्ताहिक यस बॉसचे संपादक भाषा (भाई) शेख, लेटेस्ट न्यूजचे उपसंपादक इक्बाल (भाई) शेख, पत्रकार सुधीर ढोले, बहुजन आजाद क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरू तसेच बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.



हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे व मित्र परिवार यांच्या पुढाकाराने पार पडला.

यावेळी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. बिराजदार,  डॉ.राम हुंडारे, नितीन करजोळे, लतिफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, सिध्दाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव,अक्षय बबलाद, अंबादास गज्जम,अश्फाक शेख (सर), अकबर शेख, वैजनाथ बिराजदार, यशवंत फडतरे, नितीन कांबळे, विश्वनाथ बिराजदार, विजयकुमार उघडे, विजयकुमार झुंजा, महेश जाधव, मोहन थळंगे, नरेंद्र कांबळे, अस्लम नदाफ, आदम मुलाणी, अफजल शेख, हबीब शेख, गणेश भालेराव, संगीता बिराजदार यांच्यासह आपाश्री मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत सत्कारमूर्तींच्या सामाजिक, पत्रकारिता व जनहिताच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment