Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, June 17, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

नंदीध्वज पूजन,औक्षण व भारतीय संस्कृतीच्या दर्शनातून सिद्धेश्वर प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

=================

सोलापूर :-  गुणवत्ता आणि संस्कृतीची जपणूक करणारी नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित, सिद्धेश्वर प्रशालेत  सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व संस्कारमय वातावरणात करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रवेशोत्सव उपक्रमाने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे लक्ष वेधून घेतले.

▪️  *'विविधतेतून संस्कृतीचे दर्शन'* या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी बाराबंदी, नेहरू शर्ट, विजार, सैनिक व एनसीसी पोशाख, वारकरी वेशभूषा तसेच विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारतीय संस्कृतीचे वैभव साकारले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषाही विद्यार्थ्यांनी साकारल्या.



▪️  *'एक पेड माँ के नाम'* या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत *‘हिरवा माझा ठसा’* या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे जेष्ठ विश्वस्त तथा ऑफिस सेक्रेटरी मा. श्री. नीलकंठ कोनापुरे अप्पा यांच्या शुभ हस्ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर, सरस्वती माता यांच्या प्रतिमांचे तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

प्रवेशोत्सवानिमित्त प्रशालेतील शिक्षिका व माता-पालकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टीतून त्यांचे स्वागत केले. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.


 ▪️  श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय चेअरमन *मा. श्री. धर्मराज काडादी साहेब*, सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा सिद्धेश्वर प्रशालेचे पालक सदस्य मा. श्री. प्रभुराज मैंदर्गीकर तसेच सर्व सन्माननीय विश्वस्त व शालेय शिक्षण समिती सदस्यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

 ▪️ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पाटील, उपमुख्याध्यापक श्री. राजकुमार उंबरजे, पर्यवेक्षक श्री. विनोद बिराजदार, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम आनंदी वातावरणात पार पडला. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा आणि संविधान प्रास्ताविकेच्या वाचनासह नियमित अध्यापनास प्रारंभ करण्यात आला.

▪️संपूर्ण शाळा आकर्षक व वैविध्यपूर्ण पद्धतीने सजविण्यात आली होती. प्रशालेत उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसह पालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

  ▪️ या आनंदोत्सवात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भारतीय संस्कृतीची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या प्रशालेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.



या छायाचित्रामध्ये विद्यार्थ्यांनी भारतातील महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे पोशाख परिधान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामध्ये पुढील महापुरुषांचे वेश साकारण्यात आले आहेत :

छत्रपती शिवाजी महाराज – लाल रंगाचा राजेशाही पोशाख व फेटा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – निळा सूट, चष्मा व व्यक्तिमत्त्वाला साजेसा पोशाख.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – पांढरा पोशाख, फेटा व चष्मा.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले – नऊवारी साडी व पारंपरिक वेशभूषा.

महात्मा ज्योतिराव फुले – पांढरे धोतर, काळा कोट, चष्मा व टोपी.

स्वामी विवेकानंद – भगवी वस्त्रे व पगडी.

या विद्यार्थ्यांनी आपल्या वेषभूषेद्वारे राष्ट्रनिर्माण, समाजसुधारणा, शिक्षण, स्वराज्य आणि अध्यात्म यांसाठी योगदान देणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment