सारा न्यूज नेटवर्क -
शिवसेनेच्या वर्धापन दिनी बंजारा समाजासाठी ऐतिहासिक घोषणा - कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांची शिवसेना बंजारा समाज राष्ट्रीय नेतेपदी नियुक्ती
मुंबई, 19 जून 2026 :- शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बंजारा समाजासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली.
राज्याचे मृद व जलसंधारण कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री *श्री. संजय भाऊ राठोड* यांची शिवसेनेच्या *बंजारा समाज विभागाच्या राष्ट्रीय नेते* पदी लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते *मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब* यांनी ही घोषणा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून संजयभाऊ राठोड हे देशभरातील बंजारा समाजाला एकत्र आणण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. तांडा वस्त्यांच्या विकासासाठी, आरक्षणाच्या प्रश्नासाठी आणि समाजाच्या अस्मितेसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन शिवसेना पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या घोषणेमुळे बंजारा समाजात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. भारतभर पसरलेल्या सुमारे 15 कोटी बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व शिवसेनेकडे असावे, अशी मागणी समाजाकडून सातत्याने होत होती. ती आज प्रत्यक्षात साकार झाली आहे.
मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे देशातील प्रत्येक तांडा-तांड्यात शिवसेनेचा भगवा झेंडा अधिक बळकट होईल. बंजारा समाज एकाच विचारधारेखाली एकत्र येऊन त्यांच्या उन्नती, शिक्षण आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास श्री प्रकाश राठोड मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केला
संजयभाऊ राठोड यांच्या नियुक्तीमुळे बंजारा समाजाला होणारे फायदे:
1. बंजारा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.
2. शिक्षण, आरोग्य, रस्ते व तांडा वस्त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी आणि धोरणात्मक पाठबळ वाढणार आहे.
3. आरक्षण, गोरबोली भाषेला राज्य भाषेच्या दर्जा, तांड्यांना महसुली दर्जा यांसारख्या मुद्द्यांवर केंद्र-राज्य पातळीवर थेट पाठपुरावा होणार आहे.
4. बंजारा संस्कृती, भाषा, गोर-बंजारा परंपरा यांना राष्ट्रीय पातळीवर सन्मान आणि ओळख मिळेल.
5. समाजातील युवकांसाठी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास यासाठी विशेष मोहीम राबवता येणार आहेत.
शिवसेना पक्षाला होणारे फायदे
1. *मताधार वाढ*: भारतभरातील 15 कोटी बंजारा समाजाचा मोठा मतदारवर्ग शिवसेनेशी जोडला जाईल. तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये थेट प्रवेश मिळेल.
2. *राष्ट्रीय विस्तार*: फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली शिवसेना आता बंजारा बहुल राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षाची ओळख निर्माण करेल. भगवा तांड्या-तांड्यापर्यंत पोहोचेल.
3. *सामाजिक न्यायाची प्रतिमा*: "सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष" अशी प्रतिमा मजबूत होईल. एसटी/भटक्या/ओबीसी समाजासाठी काम करणारा पक्ष म्हणून वेगळी ओळख.
4. *संघटनात्मक बळ*: प्रत्येक राज्यात बंजारा समाज विभागाच्या माध्यमातून नवीन शाखा, पदाधिकारी, बूथ कमिटी उभ्या राहतील. पक्षाची ग्रामीण पकड वाढेल.
5. *निवडणूक समीकरण*: ग्रामपंचायत ते लोकसभा - जिथे बंजारा मतदार निर्णायक आहेत तिथे शिवसेनेला थेट फायदा होईल.
ही नियुक्ती म्हणजे बंजारा समाजासाठी मिळालेला मान-सन्मान असून शिवसेना पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समस्त बंजारा समाज मा. एकनाथ शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानत आहे.
श्री प्रकाश शिवाजी राठोड
मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी


No comments:
Post a Comment