Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 5, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सलगरवस्तीतील वृक्षतोडीला श्रद्धांजली अर्पण 

  — पर्यावरणाची हळहळ


 सोलापूर :- प्रभाग क्र. २३ मधील सलगरवस्ती परिसरात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून सावली, स्वच्छ हवा आणि पर्यावरणीय संतुलन राखणाऱ्या वृक्षांच्या तोडीमुळे परिसराच्या पर्यावरणावर परिणाम होण्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेवक राजशेखर पाटील तसेच मंडल अध्यक्ष महेश देवकर यांनी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भेट देऊन वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली.


यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर मानव जीवनाचेही अविभाज्य घटक असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच भविष्यात अशा प्रकारच्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


🌳 "झाडे वाचवा – पर्यावरण वाचवा" हा संदेश देत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment