सारा न्यूज नेटवर्क -
स्वामींच्या वटवृक्षाची ऐतिहासिक गाथा ऐकून भारावलो - महावितरण संचालक धनंजय औंढेकर
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांचे मनोगत..
अक्कलकोट (श्रीशैल गवंडी,दि.२०/०६/२६):-
श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष सहवासाने पुनित झालेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील वटवृक्षाची गाथा ऐकून आपण भारावलो असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर
यांनी व्यक्त केले. नुकतेच संचालक धनंजय औंढेकर यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रथमच भेट देऊन सपत्निक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची भौगोलिक रचना व मंदीरातील वटवृक्षाचा इतिहास, व मंदीरातील दीनक्रम चेअरमन महेश इंगळे यांच्या कडून जाणून घेतल्यानंतर संचालक धनंजय औंढेकर बोलत होते.
प्रारंभी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी संचालक धनंजय औंढेकर यांचं स्वागत व दर्शनानंतर सपत्निक स्वामींचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
पुढे बोलताना संचालक धनंजय औंढेकर यांनी वटवृक्ष हा फक्त झाड नाही, स्वामी समर्थांचं जिवंत स्मारक आहे. १७० वर्षांपेक्षा जास्त झाले तरी हा वटवृक्ष आजही हिरवागार आहे. पारंब्या जमिनीत जाऊन नवीन खोड तयार झालंय. थोडक्यात हा वटवृक्ष म्हणजे स्वामींचा देह आहे. अक्कलकोटला येऊन
स्वामींसह अशा या ऐतिहासिक वटवृक्षाचं दर्शन घेतल्याने जीवन धन्य झाले आहे असे सांगून मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदर तिथ्याबद्दल समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे आभार मानले. यावेळी लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, सोलापूर मंडळचे अधिक्षक अभियंता सुनील माने,
सोलापूर ग्रामीण विभागचे कार्यकारी अभियंता मनिषकुमार सूर्यवंशी,
सोलापूर शहर विभागचे कार्यकारी अभियंता हेमंत तापकिरे, अक्कलकोट उपविभाग १ चे उपकार्यकारी अभियंता राजू आडम, अक्कलकोट उपविभाग २ चे उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास पडाळ,
मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, समर्थ स्वामी, तुषार मोरे, लखन सुरवसे, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment