Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, June 20, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 जुनी मिल ट्रस्टच्या १३७ एकर जागेवरील खरेदी विक्रीस मुद्रांक  जिल्हाधिकाऱ्यांची बंदी. - डॉ. संदीप आडके.


सोलापूर :- जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टच्या सोलापुरातील विविध पाच ठिकाणी असलेल्या १३७ एकर जागेतील खरेदी ,विक्री व फेरफार अशा सर्व व्यवहारांवर सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर, एस. ए. डहाके यांनी बंदी आणलेली आहे. संस्थेच्या जागेतील बोगस उमा गृहनिर्माण संस्था अवसायनात आल्यानंतर तसेच मुरारजी पेठ,उमा नगरी येथील दि. २२/०८/२०२५ रोजी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक १२ नावे झालेल्या बोगस खरेदीखत क्र.६३२४ च्या विरोधात जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूरचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी तक्रार केली असता त्यावर संस्थेच्या सर्व जागांवरील खरेदी विक्री व्यवहार तातडीने बंद करण्यात आलेले आहेत. जुनी मिल ट्रस्टच्या सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड, कंबर तलाव जवळील मोतीबाग, मुरारजी पेठेतील उमा नगरी, बस स्थानकासमोरील धरमसीलाईन अशा पाच ठिकाणी जागा आहेत. या जागा संस्थेच्या नावे नोंद असून याची २१ विविध उमा सहकारी संस्था व त्याच्या पोट संस्थांच्या नावे बेकायदा विक्री व अन्य व्यवहार सुरू होते. यातील सर्व बोगस उमा गृहनिर्माण संस्था व वॉटर फ्रंट फेज एक व दोन, द स्क्वेअर शॉप अँड फ्लॅट ओनर्स सोसायटी अशा इतर सहकारी गृहनिर्माण संस्था या आवसायनात काढण्यात आलेल्या आहेत. १३७ एकर जागेतील संपूर्ण मालमत्ता ही ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे याचे कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत अशी तक्रार संस्थेतर्फे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली असता त्यावर ही कारवाई केली आहे त्यामुळे संस्थेच्या या जागांबद्दल कोणीही खरेदी, विक्री , लीज असे व्यवहार करून आपली फसवणूक करून घेऊ नये असे संस्थेचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी आवाहन केले आहे. 

डॉ. संदीप आडके,

सचिव, जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर. 

9822807007.

No comments:

Post a Comment