Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, June 1, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूरात १ जून रोजी 275 कुटुंबातील 500 जणांचा सामूहिक वाढदिवस सोहळा थाटात संपन्न 

समाजात जिव्हाळा आणि माणुसकी जपणारा अनोखा उपक्रम - खा. ज्योतीताई वाघमारे 


सोलापूर : - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आणि मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या सेवाभावी, लोकाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा घेत मा. श्री. प्रकाशभाऊ राठोड (मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी) यांच्या वतीने सोमवार, दिनांक १ जून २०२६रोजी सोलापूर येथे भव्य सामूहिक वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात  आला होता याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिले होते यात 275 कुटुंबातील 500 लोकांचे सामूहिक वाढदिवस तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान व विविध शासकीय पदावर कार्य करून सेवानिवृत झालेल्या मान्यवरांचे सत्कार  करण्यात आला आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणसांपासून दूर जात असताना समाजात प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, प्रत्येक सामान्य व्यक्तीचा वाढदिवस सन्मानाने आणि आनंदाने साजरा व्हावा या उदात्त भावनेतून हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे असे मत यावेळी बोलताना राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केले.


“वाढदिवस हा फक्त केक कापण्याचा क्षण नसून आपल्या माणसांच्या प्रेमात आणि सन्मानात जगण्याचा आनंदोत्सव आहे,” अशी भावना  यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.

चाणक्य गुरुकुल व बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने  श्री काशिनाथ भतगुणकी समन्वयक  सोहळ्यात १ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी सामूहिक केक सेलिब्रेशन, सन्मान सोहळा, स्नेहभोजन तसेच आनंदी वातावरणात विविध कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन  करण्यात आले यावेळी 

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सोलापूरच्या कन्या नूतन 

खासदार ज्योतीताई वाघमारे,ज्येष्ठ समाजसेवक ब्रीजमोहन फोपलिया , नगरसेवक प्रियदर्शन साठे,शहर प्रमुख सचिन चव्हाण,

माजी नगरसेविका शैलजाताई राठोड,शिक्षक नेते वीरभद्र यादवाड,एमएसइबी निवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे,वेदमूर्ती बसवराज स्वामी तीर्थ यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यामध्ये विविध मान्यवर  पत्रकार,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते  सहभागी वाढदिवस धारकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल आणि पवित्र रोप भेट देऊन गौरव करण्यात आले.

शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम उभी राहणारी ताकद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपुलकी आणि माणुसकी पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात  असल्याचे संयोजक प्रकाश राठोड यांनी सांगितले तालुक्यातील विद्यार्थ्यांना  विविध प्रेरणादायी उपक्रम घेऊन युवा जागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले या भव्य सोहळ्यात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, गजानन महाराज मंदिराजवळ, सोरेगाव ते कुमठे रोड, विजापूर रोड, सोलापूर येथे संपन्न झाला  उपस्थित सर्व वाढदिवस असलेल्याचे सामूहिक वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आले आहे.१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या नागरिकांनी तसेच त्यांच्या मित्र, नातेवाईक, सहकारी आणि परिचितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक  ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी स्वागत आभार युसुफ पिरजादे यांनी मानले.

 सारा न्यूज नेटवर्क

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment