Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, June 19, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

उर्मिला सुमंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भजन स्पर्धा, जुळे सोलापुरात घुमला 10 भजनी मंडळांचा भक्तिरस..!

भजन स्पर्धेत समर्थ मंडळाची बाजी, चिंतामणी-रुक्मिणी मंडळाला अनुक्रमे द्वितीय-तृतीय क्रमांक.. 


सोलापूर (प्रतिनिधी) : - जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयात महिला भजनी मंडळांनी स्मृतीगंधच्या माध्यमातून भजन गुरू उर्मिला सुमंत यांना आगळी वेगळी श्रध्दांजली वाहिली. रेणुका भजनी मंडळाचे मार्गदर्शक शोभा देशपांडे, माजी अध्यक्षा नमिता थिटे, शाकुंतल भजनी मंडळाच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.  यामध्ये 10 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

   या कार्यक्रमास माजी महापौर  नलिनी चंदेले, गोविंदश्रीच्या रेखा शिवलिंग कांबळे, अ‍ॅड मानसी कुलकर्णी, गायिका सुजाता देशपांडे, शोभा देशपांडे, नमिता थिटे, मनिषा पाटील तसेच उर्मिला सुमंत यांच्या कन्या गिरीजा सुमंत उपस्थित होत्या. प्रास्ताविक शोभा देशपांडे, परिचय नमिता थिटे यांनी करून दिला.  

   भजन स्पर्धेत स्पर्धकासाठी १०मिनिटे वेळ दिला. त्यात एक गणपती व १ गुरूचे भजन सादर करायचे होते. स्पर्धेसाठी परीक्षक संगीत विशारद गायिका सुजाता देशपांडे होत्या. 

भजन स्पर्धेत 10 महिला भजनी मंडळांनी सहभाग घेत भक्तिरसाचा अनोखा संगम घडवला.

🏆 प्रथम - समर्थ भजनी मंडळ

🥈 द्वितीय - चिंतामणी भजनी मंडळ

🥉 तृतीय - रुक्मिणी भजनी मंडळ

🎖️ उत्तेजनार्थ - अष्टभुजा भजनी मंडळ



या सर्व विजेत्यांना माजी महापौर नलिनी चंदेले व रेखा शिवलिंग कांबळे यांच्या हस्ते शाल, बुके, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.  

भजन गुरू उर्मिला सुमंत यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभा देशपांडे नमिता थिटे मनिषा पाटील सुनंदा गोखले, येमुलवार, अनिता कुलकर्णी, रेखा पाटील, किरण उपळाईकर, प्रतिभा सरदेशमुख, संध्या मळेकर, विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment