Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 5, 2026

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 

 सोलापुरात पोलीस अधिकारी रविंद्र परबत यांचा पत्रकार कृती समितीतर्फे भव्य सत्कार  

सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती; शाल, टोपी, पुष्पहार देऊन गौरव


सोलापूर, ४ जून २०२६ - फौजदार चौंडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा. रविंद्र परबत यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने आज जिल्हा परिषद बागेत भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

 आयोजित या सोहळ्यात तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने परबत साहेबांचा शाल, टोपी व पुष्पहार घालून मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. 



पदोन्नतीमागील कर्तृत्व  

मा. रविंद्र परबत हे जनतेप्रती सदैव तत्पर, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि उत्कृष्ट सेवेमुळेच त्यांना ही पदोन्नती प्राप्त झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव यावेळी करण्यात आला.



या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आंबा तळभंडारे, अशोक ढोणे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, सिध्दाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, अक्षय बबलाद, सुरेश पाटील, आदर्श व्हसुरे, महेश जाधव, सुधीर ढोले, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी मा. परबत साहेब यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव केला.

सारा न्यूज नेटवर्क 
संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment