सारा न्यूज नेटवर्क -
लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा..
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार प्रदान
सोलापूर :- सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा चौथा वर्धापन दिन तसेच लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील व्यक्तींचा गुण गौरव पुरस्कार सोहळा दि २८ जून रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह एसी हॉल पहिला मजला येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून , डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. औदुंबर मस्के,बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक बबलू गायकवाड उपस्थितीत होते. चॅनलच्या निर्मितीचा उद्देश आणि मागील तीन वर्षाच्या कार्याचा आढावा मुख्य संपादक संगप्पा शालन गौतम कांबळे यांनी थोडक्यात मांडला.
यावेळी प्रत्येकाची जबाबदारी म्हणून चॅनेलच्या वतीने प्रत्येक पुरस्कार्थींना ट्रॉफी शॉल सन्मानपत्रासोबतच वड, पिंपळ, चिंच,आवळा यासारख्या भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या देशी झाडांचे रोपटे देण्यात आले. तसेच त्या रोपांचे संगोपन करून योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी शपथ देण्यात आली . या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुकासोबतच स्वागतही करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवरांसह पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त करून चॅनेलच्या या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले, याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत , प्रा. डॉ. अंबादास भासके, रमेश वडवराव, आरती बाके, मनाली जाधव, अपर्णा दळवी, पूजा खपाले आदी सत्कारमूर्तीनी आपली मनोगते व्यक्त करून चॅनेलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे आणि त्यांना देण्यात आलेले पुरस्काराचे नावपुढीलप्रमाणे :
१. मा. लेफ्टनंट - करण किशोर मोरे - देशसेवा पुरस्कार
२. मा. सुनील महादेव माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर आदर्श प्रशासक पुरस्कार
३. मा. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत - उत्कृष्ठ वकील पुरस्कार
४ . मा.मंगल शहा - प्रभा हिरा प्रतिष्ठान,पंढरपूर - आदर्श मानवतावादी पुरस्कार
५ . मा. रामभाऊ कुंडलीक दुधाळ - आदर्श समाजसेवक पुरस्कार
६ . मा. डॉ. राजेश रतिलाल फडकुले - आदर्श डॉक्टर पुरस्कार
७ . मा. प्रा. डॉ. अंबादास लक्ष्मण भासके - आदर्श सहाय्यक प्राध्यापक पुरस्कार
८ . मा. सोनाली बाबुराव कोतले – आदर्श प्राध्यापिका ९ . मा. इकबाल गुलाब शेख - आदर्श पत्रकार पुरस्कार
१० . मा. पूजा हणमंत खपाले - आदर्श पत्रकार पुरस्कार
११ . मा. नानासाहेब विठ्ठल मासाळ - उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्कार
१२ . मा. नुरुद्दीनबाशा कमाल शेख - आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
१३ . मा. रमेश आनंदा वडवराव - आदर्श सहशिक्षक (माध्य) पुरस्कार
१४ . मा. शांताबाई सिद्धण्णा बोलदे - आदर्श उपशिक्षिका (प्राथ) पुरस्कार
१५ . मा. समाधान भारत सरवदे - विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार
१६ .मा. बोधिसत्व प्रकाश गाडे - आदर्श बँकिंग सेवा पुरस्कार
१७ . मा. डॉ. अंगध नागप्पा मुके – उत्कृष्ठ लेखक पुरस्कार
१८ .मा.आरती राजकुमार बाके - उत्कृष्ठ प्रशिक्षिका पुरस्कार
१९ . मा. कु. अपर्णा नवनाथ दळवी - उत्कृष्ठ निवेदिका पुरस्कार
२० मा. ऋषिकेश रामचंद्र माळशिकारे - समाजरत्न पुरस्कार
२१ . मा. कैलास महादेव कडते, कंदलगाव - आदर्श पोलीस पाटील पुरस्कार
२२ . मा. कु. मनाली नितीन जाधव - उदयोन्मुख वास्तु विशारद पुरस्कार
२३ . मा. यासीन बशीर शेख - युवा समाजरत्न पुरस्कार
२४ . मा. गुलचंद सोपान शेंडगे - समाजरत्न पुरस्कार
२५ . मा. सहदेव मच्छिंद्र रणधरे - उत्कृष्ठ वित्तीय सेवा पुरस्कार
२६ . मा. अक्षय बाळू कोल्हापुरे - युवा प्रेरणा
यावेळी उपस्थित पत्रकार, संपादक व सामाजिक कार्यकर्ते यांनी संगप्पा कांबळे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कसबे आणि मनिषा तुपसाखरे यांनी केले तर डॉ सिद्धार्थ तळभंडारे यांनी सर्वांचे आभार मानले.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल उडाणशिव ,अमोल वाघमारे, महेश गायकवाड, अनिकेत लोंढे, रमेश जाधव , किरण कांबळे, रणजीत महामुनी , शांताराम वाघमारे,राजकुमार वाघमारे,संजय जेऊरे , बसवराज तुपसाखरे ,प्राची उळागड्डे यांच्यासह लोकतंत्र डिजिटल न्यूज चॅनेलचे सर्व प्रतिनिधिनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment