सारा न्यूज नेटवर्क -
क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त झाला नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
अक्कलकोट (दि.०१/०६/२६) :-
सोलापूर येथील क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांनी श्री मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर, सोलापूर या ठिकाणी सलग २७ वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून यशस्वीपणे सेवा केली आहे.
आज मोठ्या अभिमानाने क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी गेल्या पंधरा वर्षापासून विविध क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून घोडके सरांचा परिचय झाला. यात सरांचा हजर जबाबीपणा, कामाबद्दल असलेली सचोटी, विद्यार्थी घडवण्याची तळमळ, तसेच मितभाषीपणा याबद्दल कौतुक केले. त्यासोबतच उर्वरित आयुष्य आरोग्यदायी निरामय जावो याबद्दल श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना केली. यावेळी प्राचार्य वैजनाथ हातुरे, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सर, नगरसेवक विनोद भोसले, डॉ.प्रदीप तळवलकर, मुख्याध्यापक रमेश दिंडोरे सर, प्राध्यापक संतोष खेंडे सर, कार्तिक चव्हाण सर, सुहास छंचुरे सर, अजित पाटील सर, वसीम शेख, प्रबुद्ध चिंचोळीकर सर, बाळकृष्ण गायकवाड सर, राजेश एकबोटे, नारायण रासमक, श्रीनिवाल वालसा, प्रसाद करे,
रमेश शिंदे सर, बाळकृष्ण गोट्टीपमूल, क्रीडा प्रेमी आजी-माजी विद्यार्थी जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे
No comments:
Post a Comment