सारा न्यूज नेटवर्क -
*बौद्ध संस्कार विधींमध्ये एकसूत्रता आवश्यक; भांडवलीकरण टाळण्याचे आवाहन*
*सहाव्या धम्म संगीतीत विविध विषयांवर सखोल मंथन*
सोलापूर (प्रतिनिधी) – बौद्ध धम्म हा लोककल्याणकारी असून त्यातील संस्कार विधी साधे, सुटसुटीत आणि समाजाभिमुख आहेत. मात्र, या विधींमध्ये वाढत चाललेले भांडवलीकरण टाळून सर्वत्र एकसूत्री पद्धतीने संस्कार विधी पार पडावेत, यासाठी बौद्ध समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहाव्या धम्म संगीतीचे उद्घाटक डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी सोलापूरात केले.
बौद्ध समाजाच्या वतीने व प्रबुद्ध रंगभूमीच्या सहयोगाने वेळुवण बुद्ध विहार, शिक्षक हाउसिंग सोसायटी, दक्षिण सदर बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या धम्म संगीतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बौद्ध समाजातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून ही धम्म संगीती अध्यक्षीय मंडळाच्या नियंत्रणाखाली पार पडली.
अध्यक्षीय मंडळात भिक्खुणी धम्मचारिनी, देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचे विकासप्रणेते भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड, नागपूर बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध, संभाजीनगरचे प्रा. भारत शिरसाट, कोल्हापूरचे बापूसाहेब राजहंस आणि आनंदा कांबळे यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक सरस्वती बौद्ध यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. विजय झुमरे यांनी उपस्थितांना त्रिशरण-पंचशील दिले. मुख्य निमंत्रक डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांनी प्रास्ताविक करून संगीतीमागील उद्देश स्पष्ट केला. उद्घाटनानंतर अशोक सरस्वती बौद्ध यांनी धम्म संगीतीची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भीमपुत्र टेक्सास गायकवाड व रवींद्र मुंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले तर माता रमाई यांच्या प्रतिमेस सावित्री महिला संघटनेच्या सुनीता गायकवाड, धम्मभूमी महिला संघांच्या अध्यक्षा रोहिणी वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रवज्वलनाने तसेच प्रसिद्ध गायक सुहास सदाफुले यांच्या धम्मगीताने धम्मसंगीतीचे सुरवात झाले. कालकथित भंते परमशांती यांच्या अस्थीस्थळास प्रमुख पाहुण्यांनी वंदन केले.धम्म
संगीतीच्या विविध सत्रांमध्ये भीमपुत्र टेक्सास गायकवाड, राहुल खांडेकर, अशोक सरस्वती बौद्ध, प्रा. भारत शिरसाट, प्रा. विजय झुमरे आणि बापूसाहेब राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्रे पार पडली. विषयांची प्रस्तावना राहुल खांडेकर यांनी केली.या धम्म संगीतीत तीन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बौद्ध संस्कार विधींमध्ये एकसूत्रता निर्माण करणे, बौद्ध समाजासाठी निश्चित सणांची रूपरेषा ठरविणे आणि दैनंदिन व्यवहारात ब्राह्मणी शब्दांऐवजी बौद्ध शब्दावली विकसित करणे या विषयांचा समावेश होता. उपस्थित प्रतिनिधींनी या विषयांवर आपली मते मांडून भविष्यातील दिशा स्पष्ट केली.
धम्म संगीतीचे मुख्य संयोजक व निमंत्रक डॉ.कीर्तिपाल गायकवाड होते. निमंत्रक म्हणून प्रदीप ताकपेरे,विजयकुमार झुमरे, यू एफ जानराव,सुनिता गायकवाड, शकुंतला सूर्यवंशी, सुमित्रा जाधव, शांताबाई पाटील यांच्यासह संयोजन समितीचे फारुख शेख,कल्याण श्रावस्ती,अक्षय बबलाद,प्रबुद्ध गायकवाड, मैत्रेय बेलभंडारे विशाखा उबाळे, रोहिणी वाघमारे आणि वैशाली उबाळे यांनी काम पाहिले.यावेळी साहित्यिक योगीराज वाघमारे, प्रा.अशोक कांबळे, अशोकराव कांबळे,राजू कांबळे, जीवक सुरवसे,तात्यासाहेब माने,अशोक आगावणे,प्रा. मंगल नागमोडे अरुण गायकवाड,सुरेश शिवशरण, विद्या सदाफुले, ॲड.दर्शना चक्रवर्ती, ॲड.चंद्रकांत काळे,अमोल पाटील यांच्यासह सुमारे शंभर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.सहाव्या धम्म संगीतीत झालेल्या चर्चेमुळे बौद्ध समाजातील संस्कार, परंपरा आणि व्यवहार यांना अधिक सुसंगत व एकसमान दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी प्रबुद्ध प्रकाशनाच्या वतीने कालकथित एस पी कडलक यांच्या स्मरणार्थ बौद्ध धर्मावरील ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले.सर्व मान्यवर साहित्यिक कलावंत पत्रकार विचारवंत व धम्म उपासकांच्या सहभागामुळे सोलापूरची धम्मसंगीती यशस्वीरीत्या संपन्न झाली कार्यक्रमाचा समारोपप्रसंगी कालकथित प्रशांत ताकपेरे व आशाताई खरात यांना आदरांजली वाहून करण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे

No comments:
Post a Comment