Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, June 21, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 सोलापूरच्या महिला एकवटल्या: पावसासाठी महिनाभर ३३ दासरचनांचा नामघोष 

सुधार्मुत कन्नड महिला मंडळाचा भक्तीमय उपक्रम

सोलापूर, १५ जून २०२६  :-  पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून सुधार्मुत कन्नड महिला भजनी मंडळाने सोलापूरकरांच्या कल्याणासाठी महिनाभर अभिनव उपक्रम राबवला. १७ मे ते १४ जून या कालावधीत दररोज सायंकाळी महिला एकत्र येऊन भगवंताच्या नामस्मरणात ३३ भजने सादर करत होत्या.

उद्देश: सोलापूर जिल्ह्याचे कल्याण व पर्जन्यवृष्टी  

सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा, कोणतेही संकट येऊ नये, या प्रार्थनेसह 'हरे श्रीनिवास' व 'गुरू राघवेंद्र' नामघोष करून भजनसेवा करण्यात आली. कर्नाटकातील प्रसिद्ध दास परंपरेतील राघवेंद्र स्वामी, प्रसन्न वेंकटेश दास, पुरंदर दास, विजय दास, कनक दास, विजय विठ्ठल दास, टीकारायर दास व वादीराज दास यांनी रचलेली कन्नड भजने यात म्हटली गेली.

३३ देवतांची गाणी  

गणपती, रुद्र, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, वेंकटेश, राम, कृष्ण व गोपीलोल अशा विविध देवतांवरील ३३ रचना दररोज गायल्या गेल्या. मुरारजी पेठ येथील राघवेंद्र स्वामी मठात हा कार्यक्रम संपन्न झाला.


सांगता समारंभ व महिलांचा सन्मान  

शेवटच्या दिवशी लोकमाता श्री महालक्ष्मीची स्थापना, हळदी-कुंकू कार्यक्रम व राघवेंद्र स्वामींचा अभिषेक करून कार्यक्रमाची सांगता झाली. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

महिनाभर परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्या  

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिला बागेवाडीकर, डॉ. यशश्री कुलकर्णी, सुशिला उमरजी, शोभा बागी, लतिका कुंदरगी, उषा सोन्ना, वीणा कट्टी, वर्षा खेडकर, जयश्री मणूर, विणा कुलकर्णी, माधवी आद्य, छाया गोखले, नमिता थिटे, अनिता कुलकर्णी, जयश्री गलगली व आरती सोरटूर यांनी महिनाभर विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या एकजुटीचे व श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 





No comments:

Post a Comment