सारा न्यूज नेटवर्क -
दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य - प्रा.प्रकाश सुरवसे
स्विमिंग ग्रुपच्या वतीने १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.०३/०६/२६)
हल्लीच्या काळात शिक्षणाची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर रुजत आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण आणि आभ्यासाचं महत्व विद्यार्थ्यांना कळत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. अक्कलकोट सारख्या राज्याच्या सीमावर्ती भागात पुर्वी जेमतेम विद्यार्थीच १० वी १२ वी च्या परीक्षेत उज्वल यश संपादन करायचे आता काळ बदलला विद्यार्थ्यांची मानसिकताही. विवीध शैक्षणिक उपक्रम राबवून व होतकरु, गरजू परंतू हुशार विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करून
विद्यार्थ्यांच्या या सकारात्मक मानसिकतेला बळ देण्याचे काम नगरसेवक महेश मालक इंगळे करीत आहेत. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत कै.कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालय व श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदीर याचे हे उत्तम उदाहरण आहेत. दरवर्षी स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचंही आयोजन करण्यात येतं.
या माध्यमातून स्विमींग ग्रुपच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या सन्मानामुळे अक्कलकोट मधील शिक्षण क्षेत्राला उज्वल भविष्य असल्याचे मनोगत प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी व्यक्त केले.
नुकतेच निकाल लागून १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्विमींग ग्रुपच्या वतीनं सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्राध्यापक प्रकाश सुरवसे बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्विमिंग ग्रुप चे संस्थापक व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी कृष्णा प्रकाश सुरवसे - एस.एस.सी.९७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल व कु.मनस्वी इचगे-एस.एस. सी. ९५% गुण, अक्षय स्वामी - एसएससी ७३% गुण, प्रसाद माने ७३% गुण,
अथर्व काळे एचएससी ७३% गुण,
असिम पिरजादे एच.एस.सी.उत्तीर्ण, समर्थ झिपरे एचएससी उत्तीर्ण, चिन्मय शिंपी एस.एस.सी.९५% गुण, कु.प्रज्ञा ग्राम एस.एस.सी.९३% गुण, कु.सुप्रिया बारटक्के एसएससी उत्तीर्ण, प्रतिक इंगळे एचएससी उत्तीर्ण, निर्सर्ग वाघमोडे एचएससी उत्तीर्ण, आदर्श वाघमोडे एसएससी ९५% गुण, कु. श्रावणी चव्हाण एसएससी ८०% गुण, कु.श्वेता सुरवसे एच.एस.सी.उत्तीर्ण, शशिकांत पराणे एसएससी ८५% गुण मिळवून भरघोस यश संपादन केल्याबद्दल येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे व मान्यवरांच्या हस्ते वरील गुणी विद्यार्थी विद्यार्थीनिंचा सन्मान चिन्ह व श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश मालक इंगळे, प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा.मनोज शिंपी, प्रा.शिवशरण अचलेर, प्रा.विद्याधर गुरव सर, प्रा.अशोक कलशेट्टी, प्रा.लक्ष्मण वाघमोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य ओंकार उटगे,
दत्ता कटारे, विश्वनाथ देवरमनी सर,
बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, सुनिल पवार, सुधाकर पाटील, बाळासाहेब एकबोटे, रामलिंगय्या स्वामी, मनोज जगताप, अंकूश केत, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, मा.मेजर अमोल माने, नंदकुमार जगदाळे, जगताप सर, राजेश जगताप, सागर गोंडाळ, तुषार मोरे,
समर्थ स्वामी, रमेश शिंदे, मधुकर सदाफुले, संदीप पंडीत, सागर लोणारी, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, आदीत्य गवंडी आदींसह ज्ञात अज्ञात सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ देवरमनी सर, अशोक कलशेट्टी सर, जगताप सर यांनी केले तर आभार युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे

No comments:
Post a Comment