सारा न्यूज नेटवर्क -
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन.
साईंच्या मध्यान्न नैवेद्य आरतीचा घेतला लाभ.
शिर्डी संस्थानातर्फे कार्यकारी अधिकारी गराडे यांनी शाल-श्रीफळ देऊन केला महेश इंगळे यांचा सत्कार.
अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.२५/०६/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी आपल्या मित्र परिवारसह शिर्डी येथे
श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने संस्थानचे मुख्य अधिकारी गराडे साहेब यांनी महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
तत्पूर्वी संस्थान पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी चेअरमन महेश इंगळे यांनी साईंच्या मध्यान्न नैवेद्य आरतीस उपस्थित राहून लाभ घेतला.
यावेळी साईंच्या विश्वस्त व्यवस्थापन कार्यालयात महेश इंगळे यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्तांशी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिर्डी संस्थान यांच्या व्यवस्थापन, भाविकांसाठीच्या सुविधा, दर्शनरांग, निवास व्यवस्था व धार्मिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देवस्थानांच्या कामकाज पद्धती, भाविक सेवेचे नियोजन व भविष्यातील विकास कामांबाबत विचारांची देवाण घेवाण झाली. चर्चेनंतर महेश इंगळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, सुनिल पवार, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे,
स्वामीराव मुसळे, तुषार मोरे, रविंद्र महाले, वाहतुक पोलीस नियंत्रक बणजगोळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

No comments:
Post a Comment