Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, June 6, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 ​महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली त्यांची निष्ठा हा आपल्या सर्वांसाठी एक महान आदर्श - नगरसेवक महेश इंगळे 

शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त स्विमींग ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा


अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.०६/०६/२६) :-  ​छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. या शिव राज्याभिषेक दिनानिमीत्त शिवरायांच्या जीवन कार्याची माहिती जसे की एका उत्तम प्रशासकाचे आणि लोक कल्याणकारी राजाचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आणि शिक्षणातून याच मूल्यांची जोपासना करणे हे आपणा सर्वांचे ध्येय असावे कारण ​महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली त्यांची निष्ठा हा आपल्या सर्वांसाठी एक महान आदर्श असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक तथा स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. 

     आज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेक दिना निमीत्त येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने सर्व सदस्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस संस्थापक व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व शिवरायांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन व मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृती आपणांस संकटातही न डगमगण्याचे साहस देतात. ​छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणांस स्वराज्य दिले, स्वातंत्र्य दिले, राजा कसा असावा, याचे धडे दिले. वीरता दिली, साहस दिले  त्यांनी रयतेसाठी आपले जीवन अर्पण केले. अशा या निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, रयतेचे राजे, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी स्विमींग ग्रुपचे प्रथमेश इंगळे, संतोष पराणे, प्रा.शिवशरण अचलेर, प्रा.विद्याधर गुरव सर, प्रा.अशोक कलशेट्टी, ओंकार उटगे,  विश्वनाथ देवरमनी सर, बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, सुनिल पवार, सुधाकर पाटील, बाळासाहेब एकबोटे,  मनोज जगताप, अंकूश केत, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, मा.मेजर अमोल माने, नंदकुमार जगदाळे, जगताप सर, राजेश जगताप, सागर गोंडाळ, तुषार मोरे, समर्थ स्वामी, रमेश शिंदे, मधुकर सदाफुले, संदीप पंडीत, श्रीकांत मलवे आदींसह स्विमींग ग्रुपचे अन्य सदस्य उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment